महाराष्ट्रातील कांग्रेस चे एकमेव खासदार बाळू उर्फ़ सुरेश धानोरकर यांचे दिल्ली येथे निधन

1575

चंद्रपूर- आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. खासदार धानोरकर त्यांचे अकाली मृत्युमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. नवी दिल्ली येथे मेंदाता हॉस्पीटल येथे उपचार घेतांना त्यांनी आज पहाटे ३ वाजता अखेरचा श्वास घेतल्यांचे सुत्रानी सांगीतले.
वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

काही वर्षापूर्वी खासदार धानोरकर यांनी वेट लॉस्टची सर्जरी केली होती. या सर्जरीच्या जागेवर इंफेक्शन झाल्यांने त्यांचेवर काही दिवसापासून नागपूरात उपचार सुरू होते. किडणी स्टोनचे उपचार झाल्यानंतर, त्यांचे पोटात दुखणे वाढल्यांने एअर अॅम्बुलन्सने त्यांना दिल्ली येथे मेंदाता हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचेवर उपचार चालू असतांनाच आज पहाटे त्यांची प्रकृती खालावल्याने वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे.

वरोरा भद्रावती मतदार संघातून शिवसेनेचे आमदार असलेल्या बाळू धानोरकर यांनी 2019 च्या निवडणूकीत कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळवीत विजय मिळविला होता. राज्यात ते कॉंग्रेसचे एकमेव खासदार होते. खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर, त्यांनी पत्नी प्रतिभापलाही आमदार म्हणून निवडूण आणण्यात मोठी भुमिका बजावली होती.

मागील काही दिवसापासून त्यांचे वर्तुळात सतत त्यांचे तणाव वाढविणार्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे ते तणावातही असल्यांची माहीती आहे पुढे येत होती. मात्र त्यांच्या निधनामुळे या क्षेत्राची मोठी हानी झाली अशी प्रतिक्रिया सर्व सामान्य जनता बोलून दाखवीत आहे.