
गडचिरोली:-देशाचे लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रा.लो.आ. सरकारच्या नवनिर्माणाची ९ वर्ष सफलतेने पूर्ण झाल्याबद्दल
भाजपाचे महा जनसंपर्क अभियान व लोकसभा क्षेत्रातील झालेल्या कामाचा लेखाजोगा या संबंधित पत्रकार परिषद (गडचिरोली – चिमूर) विश्राम भवन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले.

या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने उपस्थित आमदार डॉ. देवरावजी होळी,आमदार कृष्णाजी गजबे,जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते,जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे,प्रदेश सरचिटणीस एस.टि.मोर्चा चे प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्या रेखाताई डोळस,भाजपा जेष्ठ नेते रमेश भुरसे,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष चांगदेव जी फाये, बंगाली समाजाचे जेष्ठ नेते दिपक हलदार,युवा अनिल तिडके, आशिष कोडाप तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.
या नववर्षाच्या कालावधीमध्ये देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी ज्यावेळी प्रथमतः: पंतप्रधान झाले त्यावेळी खुर्चीवर बसण्याच्या अगोदर धरती मातेला नतमस्तक होऊन नमन केल की या देशातील जनतेच्या कल्याणासाठी व सर्व सामान्य नागरिकांच्या शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याचा व सर्वांना न्याय देण्याचं संकल्प केला. या देशात स्वच्छ प्रशासन सुशासन असले पाहिजे या ९ वर्षाच्या कार्यकाळामध्ये डिजिटल इंडिया चा नारा दिला ऑनलाईन सिस्टीम चालू केली या ऑनलाईन सिस्टीमने प्रत्येक योजनेचा पैसा हा ऑनलाईन द्वारे प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते यामुळे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये अशी पद्धत अमलांत आणली. कोरोणाच्या काळामध्ये रेमडिसीयन,औषधी,लस अत्यावश्यक सोयी सुविधा पुरविल्या.कोरोणा अशा भयानक महामारीतुन देशाचे रक्षण केल. कौतुक व अभिनंदन करावा तेवढे कमी आहे.
एवढेच नाही तर ६० वर्षांमध्ये व ९ वर्षा केलेल्या कार्याचं फरक खालील प्रमाणे….
६० वर्षे घराणेशाही ९ वर्षे राष्ट्रवाद
२०१४ पूर्वी २०१४ नंतर….
————————————–
१)शौचालय ५९.४% – १००%
२)एलपीजी LPG गॅस १३ करोड़ वरुन – ३१ करोड़
३)इंटरनेट वापरकर्ता-२५ कोटी वरून -८५ कोटी
४)ऑप्टिकल फायबर ७० च्या कमी पंचायतचे वरून
२ लाखांहून अधिक पंचायती
५)ब्रॉडबँड वापरकर्ते ६ कोटी वरून ८० कोटी
६)विश्वविद्यापीठ -७२३ वरून ११,१३.
७)वैद्यकीय महाविद्यालय ३८७ –
६४८
८) AIIMS एम्स- ७ वरुन २२
९)विमानतळ,(हवाई अड्डे)७४ –
१४८
१०) (सडकनिर्माण)रस्ता बांधकाम -४२६० किमी वरुन १३,३२७ किमी
११) रक्ष निर्यात ₹९०० कोटी वरून
₹ १४,००० कोटी
१२)मोबाईल फोन निर्यात 0,शून्य वरून २८५,००० करोड़
अशाप्रकारे मा.प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या ९ वर्ष पूर्ण झालेल्या कार्याचा लेखाजोखा पत्रकारांनी जनतेपर्यंत पोहोचवावा असे ,पत्रकार परिषदेतून व्यक्त केले खासदार श्री. अशोक नेते तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा.
तसेच या पत्रकार परिषदेमध्ये खासदार महोदयांनी माहिती देत
यानिमित्ताने भाजपकडून ३० मे ३० जून दरम्यान महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून यातून मोदी सरकारने केलेली कामे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असून यासाठी जिल्ह्यात केंद्रीय मंत्री येणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी आज दिं. २९ मे रोजी पत्रकार परिषदेत दिली जिल्ह्यात साडेचौदा हजार कोटींची विकासकामे केली.
यातून महामार्ग, पूल, वैनगंगा नदीवर सिंचन प्रकल्प करता आले. वडसा- गडचिरोली, गडचिरोली- धानोरा, नागभिड- नागपूर या तीन रेल्वेमार्गाची कामे मंजूर झाली आहेत, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ३० ते ३० जून दरम्यान विविध संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे. यात लाभार्थी, व्यापारी, बुध्दिजिवी वर्ग, आदिवासी, ओबीसी , इत्यादी संमेलनाचे आयोजन केले जाईल असे सांगितले.