चकपिरंजी येथील आरो सह वाटरकुलर मशीन दोन वर्षापासून धूळ खात पडून

409

 

 

सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत चकपिरंजी येथे सन 2020-2021 अंर्तगत 250 एलपीएच आरो मशीन वाटरकुलर सह खरेदी करण्यात आलेला आहे.

सदर मशीन दोन वर्ष होऊन सुध्दा अजून पर्यंत लावलेला नाही हि बाब सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या लक्षात आणून दिल असता उडवा उडवीचे उत्तरे देत आहे.

उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी मिळेल या अपेक्षा चकपिरंजी गावातील नागरीकांचे होते मात्र स्वप्न धुळीस मिळाले आहे. या समस्या सोडविण्याकडे स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी लक्ष देत नाही.काहीजण तर या बद्दल अनभिज्ञ आहेत.त्यामुळे सामान्य जनतेनी कोणाकडे विचारणा करावी असा प्रश्न करीत येत्या एका आठवड्यात सदर मशीन सुरू न झाल्यास संबंधितांची वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरुडवार यांनी म्हटले आहे.