वीज पडून पाच जनावरांचा मृत्यू

412

शेत शिवारात वीज पडून पाच पाळीव जनावरांचा मृत्यू झाला. सदर घटना भद्रावती तालुक्यातील मांगली येथील नवरगाव रिठावरील एका शेतशिवारात दिनांक 28 रोज रविवारला दुपारी सव्वा पाच च्या सुमारास घडली.या घटनेमुळे तीन शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान झाले आहे. तालुक्यातील नवरगाव रीठावर दुपारी मेघगर्जनेसह व विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली.

 

 

या पावसामुळे ही सर्व चरणारी जनावरे एकत्र आली. मात्र त्यांच्यावर वीज पडल्याने या पाचही जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मांगली येथील नानाजी पाटील उगे यांचा एक बैल व एक गाय. शरद सातपुते यांचा एक बैल व विठ्ठल उगे यांच्या दोन गाई मृत्युमुखी पडल्या. ऐन शेतीच्या मशागतीच्या वेळी बैलाचा मृत्यू झाल्यामुळे हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे .या सर्वांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या गुरांचे मालक करीत आहे.