चीचडोह ब्यारेज मार्ग गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक

770

#Breking #chichdoh #chomorshi

 

गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी असल्याने सावली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात चीचडोह बॅरेज मार्गे गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त होत आहे मात्र या संबंधित वाहतुकीकडे दारूबंदी विभाग हा कायमच दुर्लक्षपणा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षापासून दारूबंदी आहे त्यामुळे तिथे छोट्या-मोठ्या वाहनाने दारू पोहोचण्याचे काम सध्या काही दारू तस्कर करीत असल्याचे दिसून येत आहे.मागील पाच वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा दारूबंदी होती मात्र दोन वर्षांपूर्वीच दारूबंदी हटल्याने चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची दुकाने सुरू झालेली आहे. अशातच गडचिरोली जिल्ह्यात दारू पुरवठा करण्यासाठीच सावली तालुक्यातील काही दुकाने ही अग्रेसर झालेली आहे.

 

गडचिरोली जिल्ह्याची सीमा ही सर्वात मोठी सावली तालुक्याला लागून आहे. त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी सावली तालुक्यातील अनेक चोरट्या मार्गानी डोंग्याच्या साह्याने नदी पात्रातून दारूचा पुरवठा केला जातो.अशातच चीचडोह ब्यारेज झाल्याने सावली तालुक्यातील नागरिकांना चामोर्शी व त्या परिसरात जाण्यासाठी एक चांगला मार्ग झालेला आहे मात्र या अवैध दारू विक्रेत्यांच्या भरधाव वेगाने अनेकांची भंबेरी उडत असल्याचे कळते आहे.
त्यामुळे या अवैध दारू विक्रेत्यांच्या मुजोरी मुळे अनेक अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागते अशी प्रतिक्रिया ही सामान्य प्रवाशी बोलू लागले आहे.

एकीकडे दारू बंदी असल्याने त्या परिसरात जात असलेली मोठ्या प्रमाणात अवैध दारू ही कुणाची आहे?याला आशीर्वाद कुणाचा आहे.तसेच याकडे अबकारी व पोलीस विभाग लक्ष देईल का असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.