
—————————————-
*पुरोगामी शिक्षक संघटनेचा दणका*
—————————————-
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शालार्थ वेतन प्रणाली सांभाळणारे लिपीक गिरडकर यांची नियुक्ती पंचायत समिती राजुरा येथे झालेली असताना त्यांना प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत ठेवण्यात आले होते . सदर लिपिक जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आपली मालमत्ता असल्यासारखी भावना बाळगून इतरांशी तुसडेपणाचे वर्तन करायचे . त्याबाबत अनेकांची ओरड असून संघटनेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या . त्यासंबंधाने वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येऊन लिपिक गिरडकर यांना समज देण्यात आली .परंतु सदर लिपिकाच्या वर्तनात बदल घडून आला नाही . माझ्याशिवाय शालार्थ वेतनप्रणाली कोणीच सांभाळू शकत नाही ,असा गैरसमज असलेले गिरडकर अधिकाधिक शिष्ट बनून माहिती विचारणाऱ्या शिक्षकांना अपमानजनक वागणूक देऊ लागले . याचा प्रत्यक्ष अनुभव जेव्हा पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष किशोर आनंदवार यांनी घेतला तेव्हा संबंधित लिपिकाची कानउघडणी करून समज देण्याचा प्रयत्न व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची जाणीव करून दिली . तरीही ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती कायम राहिली . त्यामुळे २४ मे च्या सहविचार सभेत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या समक्ष पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उठविलेल्या मागणीची दखल घेत शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे यांनी लिपिक गिरडकर यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे मान्य केले व दोन दिवसात कार्यवाही करण्याचे प्रोसिडिंगमध्ये नमूद करून घेतले . यावेळी संघटनेचे सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते .
—————————————-

लिपिक गिरडकर यांच्या अनेक तक्रारी संघटनेकडे होत्याच . पण जेव्हा प्रत्यक्षात मला जो अनुभव आला तो धक्कादायक होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी लिपिक असे तुसडेपणाने वागत असेल तर साधारण शिक्षकांची काय स्थिती होत असेल? यापुढे असली शिक्षकांना त्रस्त करणारी कोणतीही मनोवृत्ती खपवून घेतली जाणार नाही .
*किशोर आनंदवार*
जिल्हाध्यक्ष, म.पुरो. शिक्षक संघटना
—————————————-
