
#saoli #chandrapur #mul

चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील हिरापूर ते व्याहड या परिसरात आज दिनांक 22 ला रात्रौ 9 च्या दरम्यान अनिल गडडमवार यांच्या शेतासमोर मुख्यमार्गावरील अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात 1चितळ ठार तर दुसरा गंभीर जखमी झालेला आहे.
या मार्गावरून नागेश बद्दमवार,विवेक कुमरे हे जात असतानाच त्यांना रस्त्यावर ही दोन चितळ पडून दिसले.त्यानंतर ते जाऊन बघितले असता त्यातील एक मोठी मादी ही जखमी दिसली तिला पाणी पाजून उभी केले असता ती मादी चितळ उभी होऊन पळून गेली मात्र रस्त्याच्या कळेला एक वर्षीय चितळ हा मृतावस्थेत आहे.घटनेची माहीती नागेश बद्दमवार यांनी सावली वनपरिक्षेत्र कार्यालयाला कळविले त्यावरून कर्मचारी घटनास्थळी जावून पंचनामा केले आहे.