
#breking #accident #kapsi #saoli

पेठगाव येथील मिथुन श्रीगिरवार वय ३० वर्ष हा आज सकाळी गडचिरोली येथे आपल्या दुचाकीने दही विकण्यासाठी गेला होता. दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावी परत येत असताना कापशी- व्याहाड बूज. मार्गावरील नागोबा मंदिराजवळ पेठगाव वरून व्याहाड कडे जाणारा दुचाकी स्वार आशिष बोरकर रा. पेठगाव यांची दुचाकी समोरासमोर जोरदार धडक झाली यात दोघेही गंभीर जखमी झाले.
त्यानंतर जखमी यांना त्वरित गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मिथुन श्रीगिरवर याचा मृत्यू झाला.तर आशिष बोरकर हा गंभीर आहे. मिथुन श्रीगिरवर व आशिष बोरकर हे दोघेहो पेठगाव येथील रहिवासी आहेत. मृतक हा घरातील कमवता असल्याने कुटुंबावर संकट ओढवले आहे. त्याचे पछात पत्नी व दोन लहान मुले आहेत. त्याचे मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
