Home
Homeगडचिरोलीजिल्ह्यातील कोटगल बॅरेज,व चिचडोह बॅरेज प्रकल्पात शेती गेलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करा-...

जिल्ह्यातील कोटगल बॅरेज,व चिचडोह बॅरेज प्रकल्पात शेती गेलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करा- खा. अशोक नेते

#gadchiroli #saoli #bhajapav #ashoknete

गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज प्रकल्पात आतापर्यंत एकूण ४34.५१ हे. आर. पैकी ३४०.८८ हे. आर. जमीन संपादित झालेली आहे. उर्वरीत शेत जमीन तत्काळ संपादन करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांनी राज्य सरकारला केली आहे.

सदर प्रकल्पासाठी सिंचन विभागाने राज्य शासनाकडे साठ कोटी रुपयाची मागणी केली आहे परंतु सदर मागणीची पूर्तता लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केली आहे.

या विषयावरील सतत पाठपुरावाने आजच मंत्रालय मुंबई येथे या संबंधित आजच बैठक बोलावण्यात आली आहे प्रामुख्याने अनेक शेतकरी बांधवांना अजूनपर्यंत प्रकल्पाने जमिनीचे भूसंपादन केल्यानंतरही मोबदला दिला नाही त्यामूळे सदर राज्य सरकारने सदर साठ कोटी रुपये मंजूर केल्यास समस्त भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यास अडचण येणार नाही आज या विषयांवर येथील शेतकऱ्यांच्या अनेक दिवसांपासून च्या तक्रारीची दखल घेऊन खासदार अशोक नेते यांनी चिचडोह प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

 

प्रामुख्याने या प्रकल्पात नुकताच चामोर्शी शहरातील चार तरूण युवक प्रकल्प प्रतिबंधित क्षेत्रात आंघोळ करण्याकरिता गेल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने प्रकल्पाच्या सुरक्षा पुरविणाऱ्या कंपनीचे तेथील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणा मुळे प्रकल्प प्रतिबंधित क्षेत्रात बुडून तरुणांचा मृत्यू झाला.मृत्यू पावलेल्या त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत करावी अशी ही मागणी यावेळी केली तसेच चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज गडचिरोली येथील कोटगल ब्यारेज प्रकल्पात शेती गेलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रकल्पग्रस्त घोषित करण्यात यावा अशी मागणी केली व याकरिता लवकरच आपण राज्याचे मुख्यमंत्री मान.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक बोलावण्यात येईल असे सांगितले यावेळी प्रदेश सरचिटणीस भाजपा एस.टी मोर्चाचे प्रकाश गेडाम,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सद्स्य स्वप्नील वरघंटे ,कान्होजी लोहोंबरे,सोशल मीडिया प्रमूख रमेश अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !