शोधायला गेले वाघ…अन पिंजऱ्यात अडकले दोन बछड्यासह बिबट

1298

#maharahstra #chandrapur #saoli #Fotest #breaking

सावली(सूरज बोम्मावार)
सध्या सावली तालुक्यात वाघ व बिबट्या चांगलाच कहर करीत असून मानव व वन्यजीव मध्ये सध्या संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच सावली वनपरिक्षेत्रात अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवन क्षेत्रातील वाघोली बुटी या गावात महिन्याभराचा आत दोन महिलांना यात आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे वाघोली बुटी व परिसरात संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वेटीस धरल्याने अखेर वन विभागची चमू वाघ व बिबट यांना पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असतानाच काल वाघोली येथे झालेल्या घटनेच्या 100 मीटर अंतरावर नहराजवळ पिंजऱ्यात दोन बछड्या सह बिबट मादी अडकल्याने वनविभाग ची चमू या तिघांना सावली वनपरिक्षेत्र सोडून इतरत्र निसर्ग मुक्त केले असल्याची माहिती पुढे येत आहे.

सावली तालुक्यात वाघ व बिबट हल्ल्यात वर्ष भरात आत्तापर्यंत 9 जणांना आपले जीव गमवावे लागले.त्यामुळे सावली तालुक्यात सध्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.वाघोली बुटी या वैनगंगा नदी काढच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मक्का चे पिके लावली आहे.यातच या पिकामध्ये राहून बिबट व वाघ हे हल्ला करीत असल्याने वनविभाग ची चमू हताश झालेली आहे.त्यातच काल दिनांक 20 ला वाघोली बुटी येथे महिन्या भराचा आत प्रेमीला मुकरू रोहनकार या महिलेवर हल्ला करून जागीच ठार केले.हल्ला करणारा वाघ असल्याचे प्रत्यक्षदर्शी महिला सांगत आहे.त्यामुळे वाघाला पकडण्यासाठी काल रात्रौ पिंजरा त्याच परिसरात लावण्यात आलेला होता.

घटनेच्या परिसरात वनविभाग ची चमू ही सर्च मोहीम राबवित असतांना नहराच्या जवळ दोन बिबट चे बछडे आढळून आले.याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली तसेच या दोन बछड्याना उचलून पिंजऱ्यात ठेवण्यात आले.त्यामुळे मादी बिबट असेलच म्हणून पिंजरा लावून ठेवण्यात आला.काही वेळा नंतर पुन्हा मादी बिबट त्या स्थळी आली मात्र दोन बछडे जागेवर दिसली नाही पण ते पिंजऱ्यात दिसले त्यामुळे पिंजऱ्याच्या सभोवताल चक्कर मारून पिंजऱ्यात गेली आणि त्यात ती अडकली. त्या नंतर वनविभाग ची सावली,चंद्रपूर येथील चमू रात्रौच त्या मादीसह दोन बछडे ला घेवून चंद्रपूर येथे नेले.व त्यानंतर निसर्ग मुक्त करण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या महिलेवर हल्ला करणारा हा बिबट की वाघ असा प्रश्न उपस्तीत होत असून वनविभाग चे कर्मचारी त्या वाघाला पकडण्यासाठी पिंजरे लावलेले आहे.

*बॉक्स*
*5 जनावरे फस्त पण वाघ सापडेना*

केरोडा रोड वर महिन्याभरापूर्वी वाघाणे हल्ला करीत एकाला जखमी केले तसेच त्या परिसरात अनेकांना वाघ दिसत असल्याची तक्रारी सावली वनपरिक्षेत्र कार्यालयाला आल्या त्यावरून मोखाला-केरोडा या रस्त्यावरील शेतशिवरात वनविभाग ने कॅमेरे लावले त्यात वाघ आढळून आला. त्यामुळे त्या वाघाला जेर बंद करण्यासाठी वनविभागाने आत्ता पर्यंत 5 जनावरे ठेवली त्या सर्वच फस्त केल्या मात्र तो वाघ वन कर्मचारी च्या निशाणीवर येत नसल्याने वनविभाग ची चमू अक्षरशः हैराण झाली आहे.मात्र त्याला पकडूच असा विश्वास कर्मचारी बाळगून आहे.