Home
Homeगडचिरोलीनरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करा. - खासदार अशोकजी नेते यांनी वन...

नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करा. – खासदार अशोकजी नेते यांनी वन अधिकाऱ्यांना निर्देश

———————————————-
वाघोली बुट्टी येथे वाघाने बळी घेतलेल्या इसमाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट तसेच शासनाच्या वनविभागाकडून पाच लक्ष रुपयांचा धनादेश खासदार अशोकजी नेते यांचे हस्ते वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना सुपूर्त…..
——————————————-

सावली : तालुक्यातील वाघोली बुट्टी येथील स्वर्गीय प्रेमिला मुकरू रोहनकर वय ५० वर्ष हया आज सकाळी ११.०० वा. दरम्यान शेतशिवारात काम करीत असतांना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करून तिला जागीच ठार केले.

सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी येथे झालेल्या घटनेची माहिती ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी मान.सुधीरभाऊ मुनगंटीवार वनेमंत्री,सांस्कृतिक कार्य,मत्स्य विभाग म. रा. तथा पालकमंत्री, व गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांना घटनेसंबंधी माहिती दिली असता गांभीर्याने लक्ष वेधत खासदार अशोकजी नेते यांनी दूरध्वनीद्वारे वनेमंत्री मान.सुधिरभाऊ मुनगंटिवार यांच्या संपर्कद्वारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करा असे निर्देश यावेळी दिले.

खासदार अशोकजी नेते यांनी वाघोली बुटी येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबियाची घरी भेटी दरम्यान सांत्वन केलं,व स्वतःकडून आर्थिक मदत केली. तसेच शासनाच्या वनविभागाकडून पाच लक्ष रुपयांचा धनादेश खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते मृत्यू पावलेला इसमाच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

तसेच मागील दि.२६ एप्रिल २०२३ ला वाघोली बुट्टी येथील स्व. ममता हरिचंद्र बोदलकर हया वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन खासदार अशोकजी नेते यांनी सांत्वन भेट घेऊन आर्थिक मदत दिली.तसेच वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेला व्यक्ती श्री.किशोर गोवर्धन यांनासुद्धा याप्रसंगी आर्थिक मदत दिली .

याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी गावातील विविध समस्या संदर्भात गावकऱ्यांसह, तसेच वाघाच्या दहशती संबंधी समस्याच्या विषयासंबंधी गावकऱ्यांसह चर्चा केली.

यावेळी मा.खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल,मुख्य वनसंरक्षक रामगावकर, विभागीय वन अधिकारी खाडे साहेब,क्षेत्र सहाय्यक येडे साहेब, सावली वनपरिक्षेत्रा अधिकारी विरुडकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष विनोद धोटे,वाघोली बुट्टी चे उपसरपंच नितीन कारडे,सभापती हिवराज पा.शेरकी, माजी सरपंच टिकाराम रोहणकर,तुळशीराम रोहणकर,होमदेव मेश्राम,कुमार रोहणकर,सुखदेव बोदलकर,व्याहाड बुज चे ग्रा.प.सदस्य दिवाकर गेडाम, ग्रा.प.सदस्या वैशाली निकेसर,मनिश रक्षमवार,घोट चे जि.प.सदस्य सोनटक्के जी,तुळशीराम भुरसे, अरविंद निकेसर,संदिप सातपैसे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !