
नागभीड – तळोधी रोडवरील बोकडडोह पुलावर उभ्या असलेल्या कारला नागभीड वरुन येणाऱ्या एका अज्ञात टिप्परने शनिवारला राञौ ११.३०वाजताच्या दरम्यान जोरदार धडक दिल्याने त्यात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यात कल्पना उर्फ रुपाली रमाकांत कड्यालवार(५२) साहील रमाकांत कड्यालवार (३०) असे मृतकांचे नावे आहेत तर रमाकांत पांडुरंग कड्यालवार (६२) हे जखमी असुन त्यांना ब्रम्हपुरी येथे एका खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.हे सर्व राहणार सिंदेवाही येथिल आहेत.

सविस्तर वृत्त असे की,कड्यालवार परिवार दवाखाण्याच्या कामा निमित्त व लहान भावाला दुचाकी बुलेट खरेदी करायची असल्याने नागपुरला गेले होते.दवाखाण्याचा काम आटोपून व नविन बुलेट वाहन खरेदी करुन नागपुर वरुन शनिवारला राञौ ८ वाजता सिंदेवाही कडे येण्यासाठी निघाले.चारचाकी वाहन क्र.एम.एच.०४ जी.झेड.१३७४ या कारने रमाकांत कड्यालवार व नवरगाव येथिल राहणारे व त्यांच्या सोबत गेलेले राजेश लोणारे हे कारने येत होते.व त्यांच्या समोर नवीन घेतलेल्या बूलेट या दुचाकी गाडीवर कल्पना रमाकांत कड्यालवार व साहील रमाकांत कड्यालवार हे दोघे माय-लेक नागपुर वरुन सिंदेवाहीला येण्यासाठी निघाले.यांच्या मागे कार मध्ये बसलेले वडील (रमाकांत कड्यालवार ) हे येत होते.
तळोधी बोकड डोह जवळ दुचाकी बुलेट बंद पडली, त्यामुळे मागुन येणारी कार येथे थांबली त्याच वेळी नागभीड वरुन एका अज्ञात टिप्परने मागुन कारला व बुलेटला जोरदार धडक दिल्याने कल्पना कड्यालवार व साहील कड्यालवार ही दोघे मायलेक दुरवर फेकल्या गेली.त्यात त्यांचा मृत्यू झाला व कार मध्ये बसलेले रमाकांत कड्यालवार हे गंभीर जखमी झाले.या घटनेची माहीती नागभीड पोलिस स्टेशनला देण्यात आली.त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचून जखमी ला ब्रम्हपुरी येथे भरती करण्यात आले असून घटनेचा पंचनामा करून पुढील तपास पोलिस करीत आहे.