वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एक महिला ठार

3077

#tiger #attact #saoli #vyahadbuj

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उप वनक्षेत्रातील वाघोली बुटी येथे पुन्हा वाघाने हल्ला करून एक महिला ठार केल्याची घटना घडली असून एका आठवड्यात दुसऱ्यादा घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाघोली बुटी येथील प्रेमीला मुकरू रोहनकर ही महिला आज शेतात काम करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिला जागीच ठार केले.घटनेची माहीती मिळताच वनविभाग व पोलीस विभाग घटनास्थळी गेले आहे