किराणा दुकानात आग;250000 लाखाचे नुकसान ;नागरिकांनी विझवली आग

1271

 

#saoli #kondekhal #shorefire
सावली तालुक्यातील कोंडेखल येथील महेश चुधरी यांचे स्वतःच्या घरीच किराणा दुकान व्यवसाय सुरू होता मात्र आज दुपारी 1:30 च्या सुमारास अचानक आग लागली अन बघता बघता आगी ने रुद्रारुप धारण केले.आग लागली असल्याची माहिती ग्रामस्थांना होताच गावकरी एकत्र येऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले त्यात त्यांचे किराणा सामान सह घरातील फ्रीज,कुलर, सोफा,टीव्ही तसेच इतर वस्तू जळाल्याने त्यांचे अंदाजे 250000 लाखाचे नुकसान झाले आहे.ही आग विझविण्यासाठी ग्रामपंचायत चे पदाधिकारी, युवा मंडळ चे कार्यकर्ते पुढे सरसावले होते.नुकसान ग्रस्त दुकानदार ला शासनाकडून भरपाई देण्याची मागणी उपसरपंच नरेश बाबनवाडे यांनी केली आहे.