
#saoli #mul #chandrapur #polis

ट्रॅक्टरवर सिमेंटचे वीज खांब नेताना अनियांत्रित होऊन ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरवर बसलेल्या दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना आज शुक्रवारी पिपरी दीक्षित गावाजवळ घडली. मिथून पांडुरंग मराठे (35), अंकुश राजू गंधश्रीवार (36) असे मृत मजुराचे तर सुभाष रणदिवे (34), ईश्वर मांडवकर (37) सर्व राहणार केळझर ता मूल असे जखमी मजुरांचे नाव आहे.
मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित जवळील भजाळी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात वीज डीपी लावण्याचे काम सुरु आहे.
त्यासाठी आवश्यक सिमेंट खांब ट्रॅक्टरच्या साह्याने पिपरी दीक्षितवरून आणताना काही अंतर गेल्यानंतर पिपरीजवळ ट्रॅक्टर पलटी झाली. घटनेची माहिती पसरताच परिसरातील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. यावेळी दोघांना मृत घोषित करण्यात आले. मूल पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
