
शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्रावर उपअभिकर्ता संस्थांनी धान खरेदी केल्या नंतर उचल करेपर्यंत
आजवर शासन स्थरावरून 1 टक्के घट मंजुर करण्यात आली होती. त्याचप्रमाणे शासकीय आधारभूत धान खरेदी करणाया उपअभिकर्ता संस्थांना शासनाने ठरवून दिलेल्या हंगामातील हमीभावाच्या दिड पटीने खरेदी कमिशन अदा करण्याचे आजवर ठरले होते.

0.50 % मा. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांचे सुचने नुसार घट 1% प तर कमिशन हि आधारभुत किमतीच्या 1 % देण्याचे नमुद केले असल्याने हि बाब उपअभिकर्ता
संस्थाना न परवडणारी आहे. त्यामुळे सर्व संस्थांचे प्रतिनिधी सिंदेवाही येथे एकत्र येत मागण्या केल्या आहे त्यात सध्याची धानाची घट असुन ती 3 % करणे व खरेदी सुरू होताच धानाची उचल करणे, संस्था खरदी कमिशन प्रति क्विंटल रूपये 20.40 केले असुन ही अट अमान्य असल्याबाबत,संस्था खरेदी कमिशन प्रति क्विटल 50 रूपये करण्याबाबत,वारंवार केंद्रांची चौकशी करून नाहक त्रास देणे बंद करणे, संस्थांना खरेदी कमिशन व आनुसांधिक खर्च वेळेत देण्याबाबत,.गोदाम भाडे हे मालाचे उचल होईपर्यंत सार्वजानिक बांधकाम विभागाच्या भाडे प्रमाणपत्रानुसार % किंवा तांदुळ ठेवण्यासाठी भाडे तत्वावर देण्यात येणारे प्रमाणे देणे.
वरील मागणी ची आपल्या स्थावर पुर्तता होईपर्यंत उपअभीकर्ता संस्था आधारभुत धान खरेदी यांना मिळेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील संपुर्ण उपअभिकर्ता संस्था शेतकन्याचे 7/12 ऑनलाईन नोदणी तसेच रब्बी हंगामात धान खरेदी करणार नाही. करिता कुठलेही अनुचित प्रकार झाल्यास संस्था जबाबदार राहणार नसल्याने मागण्याची पुर्तता लवकरात लवकर करण्यात यावी.अशी मागणी चे पत्र चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, व्यवस्थापकीय संचालक दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन मुंबई,जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांना अध्यक्ष-श्री अनंता तुकाराम बनपुरकर,सचिव.-श्री दिपक वसुदेव जवादे,उपाध्यक्ष-श्री हितेश दिगांबर ठिकरे इतर सदस्य यांनी पाठविले आहे.