अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर राजुरा वनविभागाची कारवाई #75 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक#

297

राजुरा (संतोष कुंदोजवार)-
राजूरा वनपरिक्षेत्र अंतर्गत नियतक्षेत्र खांबाळात अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या दोन आरोपींना दुचाकी व साग आणि सीसम प्रजातीचे लाकडी वनोपज असा सुमारे 75 हजार रुपयांच्या मद्वेमालासह राजुरा वनकर्मचार्यानी अटक केली आहे
15 मे रोजी खाबाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 178 मध्ये गस्त करतांना दोन ईसम अवैधरित्या वृक्षतोड करून मोटार सायकलद्वारे वाहतूक करीत असल्याचे वनकर्मचार्यास निदर्शनास येताच त्यांना मोटार सायकलसह ताब्यात घेऊन सदर आरोपींविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी सुनील भाऊराव हजारे (41), प्रभाकर बारीकराव टेकाम (67) असे आरोपीचे नाव असून दोघेही खांबाडा येथील रहिवासी आहेत
सदर प्रकरणाची माहिती वरिष्ठ वणाधिकार्याना देण्यात आली त्यांचे मार्गदर्शनात आरोपीच्या घराची वन कर्मचाऱ्यांचे सहकाऱ्याने झडती घेतली असता त्यांचे घरामधून अवैधरित्या साठवून ठेवलेला सिसम आणि साग प्रजातीचे वनोपज व ईतर साहित्य जप्त करण्यात आले.सोबत दुचाकी जप्त करण्यात आली सुमारे 75 हजार रुपयांचा मुद्देमालासह दोन आरोपींना यावेळी अटक करण्यात आली ही कारवाई मुख्य वनसंरक्षक श्वेता बोड्डू,सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड,क्षेत्र सहायक संतोष.संगमवार, क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते,वनरक्षक दिनेश चंदेल, अर्जुन पोले, वर्षा वाघ, मीरा राठोड, संजय सुरवसे , सायस हाके,सुनील गजलवार व वनमजुर प्रभूदास धोटे,चालक मंगल पाचभाई यांनी केली.बर्याच दिवसाच्या प्रयत्नानंतर हे आरोपी वनविभागाच्या जाळ्यात अडकले असून पुढील तपास वनविभाग राजुरा कडून सुरु आहे या कार्यवाहीने अवैधरित्या वृक्षतोड करून तस्करी करणारे चांगलेच धास्तावले आहे.