रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक वर दुचाकी धडकली;2 जण जागीच ठार

2079

#gothangaon #braking #accident #gadchiroli

गोठणगांव नाक्यावर रस्त्याचा कडेला उभा असलेल्या ट्रक ला पाठीमागून येणाऱ्या भरधाव दूचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार २ इसम जागीच ठार झाल्याची घटणा आज सोमवार रोजी सांयकाळी ७
वाजताच्या सुमारास घडली.
अपघातात दिलीप मैनू कूमोटी (३२) व सूरेश राईंचवार (५६) दोन्ही रा. अंगारा हे ठार झाले.

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरापासून दोन कीलोमीटर अंतरावर असलेल्या गोठणगांव टी पाइंट नाक्यावर मालेवाडा कडून येणारे रस्त्याच्या कडेला आज सांयकाळ पासूनच सि जी ०४ जे १३३५ क्रमांकाचा ट्रक उभा होता
सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास मालेवाडा कडून विना क्रमांकाची दूचाकी भरधाव वेगात शहराकडे येताना या ट्रकला पाठीमागून धडकली या अपघातात दूचाकी वरील दोघांचाही जागीच मृत्यु झाला यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यानी घटणास्थळावर धाव घेत दोन्ही मृतदेहाना रूग्नवाहीकेतुन कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्नालयात पोहचले.

ठाणेदार संदीप पाटिल व साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यानी सूद्धा घटणास्थळाला भेट देत घटनेचा पंचनामा केला व उभ्या ट्रकला पोलीस स्टेशन येथे जमा केले आहे.

साभार-वैनगंगा न्यूज