चिचडोह प्रकल्पाचे देखभाल सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनी व प्रकल्प अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करा-खासदार अशोक नेते यांची मागणी

508

 

#saoli #chamorshi #chichdoh #mpashoknete

चामोर्शी जवळील वैनगंगा नदीच्या तीरावरील चिचडोह प्रकल्प येथे चामोर्शी शहरातील चार युवक आंघोळी करिता गेले व पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. काही वर्षांपासून येथे अनेक युवकांचा येथील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे?
हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे चिचडोह प्रकल्प येथील क्षेत्र हा प्रतिबंधित आहे व या प्रतिबंधित क्षेत्रात सामान्य नागरिक यांना जाण्यास सक्त मनाई आहे याकरिता येथे चिचडोह प्रकल्प चे वतीने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे.

परंतु सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंपनीचे व सिंचन प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणा मुळे त्या निषाप तरुणांना प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यासाठी मज्जाव न केल्याने हा प्रकार घडला आहे तसेच ज्याप्रमाणे चिचडोह परिक्षेत्रात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना चारपट मोबदला देऊन येथील जमीन अधिग्रहण करण्यात येत आहे त्याच प्रमाणे चिचडोह सिंचन प्रकल्प येथे मृत्यू पावलेल्या चार तरूणांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत करावी व चिचडोह प्रकल्प येथे व देखभाल करणाऱ्या कंपनीवर तसेच सबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा खटला करून निलंबित करण्यात यावा अशी मागणी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केली.

खासदार अशोकजी नेते यांनी भ्रमणध्वनीवरुन सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता पवार ,डेपटी इंजिनिअर शुभम मेश्राम,वरिष्ठ अधिकारी यांना येथील घटने बाबत माहिती दिली व पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले व मृतकांच्या ,कुटुंबीयांना सांत्वन भेट दिली व स्वतः कडून मृतकांच्या कुटुंबीयांना भाजपा प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे यांचे हस्ते आर्थिक मदत देण्याची सूचना केली यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाश गेडाम , नगरसेवक आशीष पिपरे ,भाजप नेते संजय पंदीलवार ,श्रावणजी सोनटक्के, अशोक धोडरे ,नरेश अल्सावार , सोपान भाऊ नैताम ,रेवणाथ कुसराम ,रमेश अधिकारी ,
व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.