शेतात करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू;वडिलाला वाचविण्यासाठी गेलेला मुलगा गंभीर जखमी

2591

#death #farmer #saoli breaking

सावली तालुक्यातील सोनापूर येथील शेतकरी तेजरावजी भुरसे यांचे शेतात पाणी करत असतानाच त्यांना विजेचा करंट लागल्याने ते होरपळत असतांना बाजूला असलेला मुलगा ही आपल्या वडीलाला वाचविण्यासाठी धावला आणि तोही गंभीर जखमी झाला आहे.

यात शेतकरी तेजराव भुरसे यांचे निधन झाले तर त्यांच्या मुलगा दिनेश भुरसे हे देखील गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली.त्यांनतर पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केले आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.