
#eligle #daru #saolipolisstation
सावली(सूरज बोम्मावार)
मुल ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरून चारचाकी वाहनाने अवैध दारू वाहतूक होणार आहे अशा मिळालेल्या गोपनीय खबरेवरून दिनांक 9 च्या मध्यरात्री पोलिस स्टेशन सावली समोर तात्काळ नाकाबंदी केली असता फोर्ड EcoSport MH 27AR 9531 मध्ये रॉकेट संत्रा देशी दारू कंपनी चे 44 बॉक्स मिळून आले.

मिळून आलेली नमूद क्रमांकाची कार किंमत 8 लाख रु व देशी दारू 44 बॉक्स किंमत 2 लाख 14 हजार रुपये असा एकूण 10 लाख 14 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तीन आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्ाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी साहेब अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू व उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांचे मार्गद्शनाखाली व ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पो उपनिरीक्षक मडावी, स. फौ. खरकाटे, पो का. धीरज, निलेश महिला अंमलदार विशाखा यांनी केली.