Home
Homeराजुरारामपूरच्‍या विकासासाठी पूर्ण शक्‍तीनिशी तुमच्‍या पाठिशी उभा राहील – पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार*...

रामपूरच्‍या विकासासाठी पूर्ण शक्‍तीनिशी तुमच्‍या पाठिशी उभा राहील – पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार* *रामपूर (ता. राजुरा) येथील ग्राम पंचायत स्‍थापना दिवसाला प्रमुख उपस्थिती.*

 

*राजुरा,(नेताजी)

गेल्‍या अनेक वर्षांपासून रामपूर गाव अनेक सोयीसुविधांपासून व विकासापासून दूर राहीले आहे, परंतु आता मी पूर्ण शक्‍तीनिशी रामपूर वासियांच्‍या पाठिशी ठामपणे उभा राहील, असे प्रतिपादन राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
रामपूर येथील ग्राम पंचायत स्‍थापना दिवस व पाणी पुरवठा जलशुध्‍दीकरण केंद्राच्‍या भूमीपूजन तसेच विविध विकासकामांच्‍या लोकार्पण सोहळा प्रसंगी नामंदार. मुनगंटीवारांनी वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, अॅड. संजय धोटे, रामपूर ग्राम पंचायतच्‍या सरपंच वंदना गौरकार, उपसरपंच सुनिता उरकुडे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव गौरकार,, मजिप्राचे कार्यकारी अभियंता श्री. उध्‍दरवार, वीजवितरणचे उपविभागीय अभियंता श्रीनिवास बडगू, ग्रामपंचायत सदस्य विलास कोदीरपाल, रमेश झाडे, जगदीश बुटले, हेमलताताई ताकसांडे, शितल बानकर, अनिता आडे, लताताई डकरे, लक्ष्मी चौधरी, ग्रामविकास अधिकारी सचिन विरुटकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष गुलाब दुबे, माजी सरपंच रमेश कुडे, उज्वल शेंडे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत रामपूर येथे १३ कोटी ६७ लाख रूपये किंमतीची पाणी पुरवठा योजना व पाण्‍याची टाकी तसेच जलशुध्‍दीकरण केंद्राचे भुमीपूजन संपन्‍न झाले. त्‍याचप्रमाणे गावात केलेल्‍या विविध कामांचे लोकार्पण तथा ग्राम पंचायतच्‍या विकासाकरिता मदत करणा-या आजी-माजी लोकप्रतिनिधींचा यावेळी सत्‍कार करण्‍यात आला.
यावेळी बोलताना नामदार मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, आज बुध्‍द पोर्णिमा आहे. आजच्‍या दिवशी आकाशात सगळयात जास्‍त उजेड असतो, अश्‍यावेळी रामपूरचा वर्धापन दिन आहे हा अतिशय उत्‍तम योग आहे. आज मी आपणा सर्वांना हे सभागृह जिल्‍हा विकास निधीतील नाविन्‍यपूर्ण योजनेतुन मंजूर करून लवकरात लवकर तयार करण्‍याची घोषणा करतो. तसेच रामपूर गावातील अंतर्गत रस्‍त्‍यासाठी सरपंचांनी मागीतल्‍यानुसार २० लाख रूपये मंजूर करण्‍याची सुध्‍दा घोषणा करतो. त्‍याचप्रमाणे राजुरा-आदिलाबाद या राष्‍ट्रीय महामार्गावरील रामपूरजवळील भवानी नाल्‍यामध्‍ये पुराचे पाणी निघुन जाण्‍यासाठी एका पुलाची मागणी झाली आहे हा पुल सुध्‍दा लवकरात लवकर पूर्ण करण्‍याचे निर्देश मी अधिका-यांना देणार आहे. ज्‍यामुळे महाविद्यालयामध्‍ये पावसाळयात जाताना होणारा त्रास वाचेल.
याप्रसंगी माजी आमदार वामनराव चटप, संजय धोटे, सुदर्शन निमकर, देवराव भोंगळे या सर्वांच्‍या या ग्राम पंचायतीला वेळोवेळी मदत व मार्गदर्शन केल्‍याबद्दल त्‍यांचा ग्राम पंचायतीतर्फे सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी या सर्वांचे यथोचित मार्गदर्शन सुध्‍दा झाले. याप्रसंगी ग्राम पंचायत तथा अनेक सामाजिक संघटनातर्फे सुधीर मुनगंटीवार यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच वंदनाताई गौरकार, प्रास्ताविक नामदेव गौरकार यांनी केले, संचालन श्रीकृष्ण गोरे, आभार प्राध्यापक सुयोग साळवे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता रामपूर ग्रामविकास बहुद्देशीय संस्थेचे व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !