Home
Homeराजुरापांढरपौणि जवळ दुचाकी बसच्या धडकेत  दोन दुचाकीस्वार ठार

पांढरपौणि जवळ दुचाकी बसच्या धडकेत  दोन दुचाकीस्वार ठार

 

राजुरा (नेताजी)

महाराष्ट्र तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गावर राजुरा तालुक्यातील पांढरपौनी नजिक बस आणि दुचाकींचा भिषण अपघात झाला असुन ह्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील सायंकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान पांढरपौनी जवळील नाल्या शेजारी असलेल्या एन एन ग्लोबल कोल वाशरी येथिल कामगार संदिप सिंह वय 31 वर्ष व दुसरा एक कामगार आपल्या दुचाकीने पांढरपौनी येथे परत येत असताना राजुरा येथुन पालगाव येथे जाणारी चंद्रपूर पालगाव  बस क्र MH 07C 9538 ह्या बसची जोरदार धडक बसल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार  राजुरा कडून बस येत असतानाच दुचाकीस्वार अचानक पांढरपौनी गावाच्या मार्गावर वळले. समोर अचानक दुचाकी आल्याने बस चालकाने ब्रेक मारला व बस बाजुला घेण्याचा प्रयत्न केला. ह्या प्रयत्नात बस रस्ता सोडुन नालीत अडकली मात्र दरम्यान बसची दुचाकीला धडक लागल्याने दोन्ही दुचाकीस्वार  बस खाली आले आणि गतप्राण झाले असे समजते,मात्र सुदैवाने बस मधील प्रवाशी सुरक्षित असुन बसमधील कुणाचीही प्राणहानी झाली नाही. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असुन राजुरा पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.राजुराचे वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचून पुढील कारवाई करीत आहे

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !