ग्रामजयंती निमित्य श्री गुरुदेव सेवा मंडळ तर्फे ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळे वाटप

324

 

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ सावली तालुका यांच्या विद्यमाने, दिनांक 28-4-2023 शुक्रवारला ग्रामजयंती महोत्सवाच्या पर्वावर सावली तालुका गुरुदेव सेवा मंडळ च्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.

 

तालुक्यातील सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला, व रुग्णांना फळासोबत भजनाचे व सक्रिय पाठाचे वह्या देण्यात आल्या. यावेळी माननीय संत मुरलीधर महाराज हरणघाट, वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख साहेब, जाणीवंत घोडमारे, रमेशजी बोरुले, सुधाकरजी गाडेवार सर, विनोद बांगरे, मुक्तेश्वर राजूरकर,संजय भाऊ मेश्राम, प्रभाकरजी गाडेवार सर, सुधाकरजी कोलप्याकवार, बंडुजी मेश्राम, डॉ. गुरनुले साहेब, दिलीपभाऊ येलकेवार, भाविकाताई मुळे, इंदिराताई राऊत, हजारें ताई व बराच महिलावर्ग इतर सर्व तालुक्यातील गुरुदेव सेवकांच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय सावली येथे फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये माननीय डॉ.देशमुख सरांना ग्रामगीता भेट देण्यात आली, तसेच सोबत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा दवाखान्यामध्ये देण्यात आल्या. व मान्यवरांचे मार्गदर्शन घेण्यात आले.

यावेळी सर्वधर्म समभाव ही राष्ट्रसंतांच्या विचाराची देशालाच नव्हे तर विश्वाला गरज आहे. यावर संत मुरलीधर महाराज, बोरुले दादा,घोडमारे दादा आणि डॉक्टर देशमुख साहेब यांचे मार्गदर्शन घेण्यात आले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद बांगरे यांनी केले. तर प्रास्ताविक संजय भाऊ मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन मुक्तेश्वर राजूरकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व सावली व मूल तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचे आभार माणण्यात आले.