आत्ताची ब्रेकिंग न्यूज….. बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

1650
#########

व्याहाड बुज(सुनील बोमनवार)
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावली तालुक्यातील वाघोली बुटी परिसरात सद्या वाघ व बिबट चा चांगलाच धुमाकूळ असून वाघोली येथील महिला शेतात गेली असता त्या महिलेवर बिबट ने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.

ममता हरीशचंद्र बोदलकर वय 60 रा.वाघोली बुटी ही महिला आज सकाळी शेतात गेली असता आज सायंकाळी 4 च्या सुमारास त्या महिलेवर बिबट ने हल्ला केला आणि तिला जागीच ठार केले.सदर घटना घडताच नागरिक वनविभाग सावली यांना माहिती दिली असून शेकडो लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली आहे.परिसरात असलेल्या वाघ व बिबट चा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.