
सावली महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्ज माफी दीली त्याबद्दल शिंदे- फडणवीस सरकारचे आभार मानले. परंतु सावली तालुक्यांत नव्हे तर ब्रम्हपुरी विधानसभा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजराजे महाराज व महात्मा फुले कर्ज माफी योजनेतून पूनर्गठीत शेतकरी सुटलेले होते म्हणून अनेक वर्षा पासून थकीत असलेले पिक कर्ज शासनाने माफ केले.

परंतु सन २०१३-२०१४ व २०१४-२०१५ या वर्षातील शेतकऱ्यानी घेतलेले पीक कर्ज त्या त्या वर्षात शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाले असल्याने त्या वर्षात पीक कर्ज भरता आले नाही त्यांना शासनाने शेतकऱ्यांना पुनर्गाठीत कर्ज देउन जुन्या कर्जाचे हफ्ते पाडून दिले होते पण निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतकर्यांचे पीक उत्पादन झाले नाही. त्यामुळे मागील कर्ज व पुमर्गठीत कर्ज शेतकऱ्यांना कर्ज भरता आले नाही अशा प्रकारे डबल कर्जाचा डोंगर या शेतकऱ्यांवर भर पडली आणि त्या कर्जावरील व्याजदरात वाढ होत गेली त्यामूळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या वरील पूनर्गठीत पीक कर्ज सन २०१३-१४ पासुन भरले नाही शेतकऱ्यांना पिक कर्ज माफी मिळणार आहे या माफीत पूनर्गठीत कर्ज धारकांना हि लाभ होईल अशी आशा ठेऊन शेतकरी प्रतिक्षेत होता परंतु त्यांच्या आशा आकांक्षाचे निराशा झाली आणि आजही शेतकरी पीक कर्ज योजनेचा लाभ मिळेल अशी आशा ठेऊन आहे.
थकीत पूनर्गठीत शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेचा लाभ द्यावा पूनर्गठीत शेतकऱ्यांचं कर्ज माफ कराल या मागणीच निवेदन राज्यांचे वने, संस्कुती कार्य व मत्स्व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार व सहकार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदन देऊन चर्चा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी केली
