सावली तालुका युवक कांग्रेस अध्यक्षपदी किशोर कारडे यांची निवड

669

#congress #kadholi #memberofyuvakcongress #saolitaluka

सावली(प्रतिनिधी)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे यांचा अभिप्रेत असलेली पक्ष संघटना बांधण्यासाठी पक्ष श्रेष्टी च्या संमतीने माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र यांचा मान्यतेणे चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण )युवक कांग्रेस कमिटी तर्फे जिल्हाअध्यक्ष शंतनू धोटे यांनी कढोली ग्रामपंचायत सरपंच किशोर कारडे यांची सावली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.

कांग्रेस पक्षाची ध्येय धोरणे व कार्यक्रम राबवितांना समाजातील प्रत्येक घटकात न्याय देऊन पक्ष मजबूत करण्यासाठी आपण प्रामाणित प्रयत्न कराल ही अशा बाळगुण कारडे यांच्या नियुक्ती बद्दल पत्र देत त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

किशोर कारडे हे युवा राजकारणी असून ते 2 टर्म कढोली चे सरपंच पदा वर विराजमान आहे.सुसंकृत युवा असून सर्वांसोबत चे चांगले संबंध हे त्यांची जमेची बाजू आहे.तसेच ते तैलीक समाजाचे कार्यकर्ते आहे.त्यांच्या निवडी मुळे सावली तालुक्यातुन त्यांच्या वर अभिनंदन चा वर्षाव होत आहे.