
#saoli $forest #corruption #department #polis #antycorruption

सावली (प्रतिनिधी)
वन जमिनीवर वृक्ष लागवड न करण्यासाठी महिला वनरक्षक यांनी शेतकऱ्याला 10 हजार रुपयांची लाच मागितली, सदर प्रकरणाची पडताळणी केल्यावर चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वनरक्षकाला खाजगी इसमामार्फत लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
तक्रारदार हे सावली तालुक्यातील उपरी येथील रहिवासी असून ते शेतीचा व्यवसाय करतात, तक्रारदार यांच्या वडिलांनी वर्ष 1982 मध्ये मौजा कापसी येथील सर्व्हे क्रमांक 436 मधील 44.92 हेक्टर आर या शासकीय जमिनिपैकी 1.21 हेक्टर आर जमीन ही वनजमिनिवर अतिक्रमित करण्यात आली होती.
त्या जमिनीवर खरीप हंगामाचे पीक घेऊन तक्रारदार हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, मात्र उपरी बिटातील वनरक्षक शारदा रामदास कुलमेथे यांनी त्या जमिनीवर वनविभागामार्फत रोपवन न करण्यासाठी तक्रारदाराला 10 हजार रुपयांची लाच मागितली.
पैसे न दिल्यास त्या जागेवर रोपवन करण्यात येईल असे तक्रारदाराला सांगितले, 13 एप्रिलला याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली, तक्रारीची पडताळणी केल्यावर पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी सापळा रचला.
तडजोडी अंती वनरक्षक कुलमेथे यांनी 5 हजार रुपये तक्रारदाराला देण्याचे सांगितले, सदर लाचेची रक्कम घेण्यासाठी कुलमेथे यांनी स्वतःच्या पतीला 40 वर्षीय संजय अंतराम आतला यांना पाठविले.लाचेची रक्कम घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वनरक्षक यांचे पती यांना रंगेहात अटक केली, त्यानंतर सदरील वनरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी नरेश ननावरे, रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे व पुष्पा कोचाळे यांनी केली.
