चार चाकी वाहनाची झाडाला धडक… गाडी ने घेतला पेट;तिघेही थोडक्यात बचावले…

1936

 

#carfire #triber #asolamendha #pathari #saoli #accident

सावली(सूरज बोम्मावार)
सावली तालुक्यातील पाथरी जवळ असलेल्या असोलामेंढा नहराजवळ वळणावर वाहन चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला आपटली व वाहनाने पेट घेतला.प्रसंग सावध राखून तिघेजण बाहेर पडल्याने जीव वाचला ही घटना आज सोमवार रोजी साडेचार च्या सुमारास घडली.

राहुल रामचंद्र जुमनाके रा. संजय नगर चंद्रपूर व त्यांचे नातेवाईक गौरव कुसराम व सौरव कुसराम हे तिघेही चार चाकी वाहनाने आसोला मेंढ्याला नातेवाईकांना सोडून दिले व आसोला मेंढा येथून परत येत असताना पाथरी जवळ नहरजवळ असलेल्या वळण असलेल्या ठिकाणी वाहन चालक राहुल जुमनाके यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी नंबर एम.एच. 34 बी. आर. 5724 रेनॉल्ट ड्रायव्हर ट्रायबेर ही कार झाडाला आदळली परंतु काही क्षणातच गाडीने पेट घेऊन गाडी पूर्णपणे जळून खाक झाली त्यापूर्वीच गाडीतील तिघेजण बाहेर पडले. या घटनेची माहिती पाथरी पोलिसांना कळतात घटनास्थळ गाठून वाहन चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे.