एअर वॉलच्या चोरी प्रकरणी 3 आरोपींना अटक

1467

#crime #saolipolice #chandrapur #whaterfilter

सावली(प्रतिनिधी)
नळ योजने करिता टाकण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन मधील एअर वॉल हे सतत चोरी होत असल्याची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. दोन आठवड्यात या घटनेत वाढ होत असल्याने सावली पोलिसांनी गुप्त तपास करीत अखेर त्या चोरांना पकडले असून यात 3 आरोपींना अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 12/03/23 ते 01/04/23 चे दरम्यान मौजा कवठी, पारडी, रूद्रापूर शेत शिवरातून जाणाऱ्या पाणी पुरवठा होणाऱ्या पाईप लाईन ला लागून असलेले एकूण 9 एअर वॉल किंमत 45,000/- रु चे अज्ञात चोराने चोरून नेले. अशा तक्रारीवरून सदर सावली पोलिसात अपराध क्र 82/23 कलम 379 भा द वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी ओमप्रकाश पोटे अंकुश पोटे दोन्ही रा. पारडी ता सावली जिल्हा चंद्रपूर , अजय गोहने रा फोकुर्डी ता चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांनी संगनमत करून सदरचे एअर वॉल चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.

नमूद तिन्ही आरोपींना दिनांक 06/04/23 रोजी अटक करून त्यांचेकडून त्यांनी चोरी केलेला संपूर्ण 9 एअर वॉल की.45000/- रु हस्तगत केला आहे. यातील आरोपी क्रमांक 4) मधुकर मेडपल्लीवर रा सावली हा भंगार व्यावसायिक असून त्याला सूचना पत्रावर सोडण्यात आले.

अटक आरोपींना न्यायालयीन कोठडी करिता रवाना केले आहे.
सदरची कारवाई मा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी,अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू,उपविभागीय पोलिस अधिकारी मललिकार्जुन इंगळे यांचे मार्गद्शनाखाली ठाणेदार सावली आशिष बोरकर यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण मडावी, चंद्रशेखर गंपलवार यांनी केली आहे.पोलिसांनी केलेल्या कामगिरी चे सर्वत्र कौतुक होत आहे.