अज्ञात वाहनांचे धडकेत बिबट गंभीर जखमी *कोठारी ते झरण मार्गावरील घटना*

290

 

अज्ञात वाहनांचे धडकेत बिबट गंभीर जखमी
*कोठारी ते झरण मार्गावरील घटना*
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनांची धडक बसल्याने बिबट गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास झरण गावाजवळ घडली असून वनकर्मचारी घटनास्थळी पोहचले असून चद्रपूर व्याघ्र उपचार केंद्रात नेण्यात येणार असल्याचे सांगितले
बल्हारशाह ते गोंडपीपरी मार्गावर सुरजागड लोहखनिज वाहतुकीमुळे वर्दळ वाढलेली असल्याने बरेच अपघाताच्या घटना घडत आहे आज सकाळीच या मार्गातील झरण (कोठारी) गावालगत बिबट जंगलातून रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनांची जोरदार धडक बसली यात बिबट गंभीर जखमी झाला आहे मार्गावरून जाणाऱ्या लोकांनी लगेच वन विभागास याची माहिती दिली लगेच वनविकास महामंडळ व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून वरिष्ठ अधिकार्याच्या मार्गदर्शनात चंद्रपूर येथील व्याघ्र उपचार केंद्रात उपचारासाठी नेण्यात येणार असल्याची माहिती दिली तसेच अज्ञात वाहनाविरुद्ध वनगुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करणार असेही वनकर्मचार्यानी सांगितले
माहिती होताच बिबट पहाण्यासाठी लोकांची गर्दी झालेली होती