
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
वाघाच्या कातडीची तस्करी प्रकरणात आरोपीचा तीन दिवसांचा कस्टडी रिमांड मिळाला असून वन अधिकाऱयांनी केलेल्या चौकशीत त्या वाघाचे वाघ नखे,दात व इतर अवयव तेलंगानातून जप्त करण्यात यश आले आहे
वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तेलंगणातील सहा आरोपींना कातडीसह जिवती वनविभागाचे कर्मचाऱयांनी पातागुडा येथे अटक केली होती या आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कस्टडी रिमांड देण्यात आला त्यानंतर सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार,जीवतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे व टीम आणि तेलंगणा राज्यातील आशिफाबाद (कुमरंभीम)चे वन अधिकारी यांनी संयुक्त कारवाई राबवून तपास केला असता आरोपीच्या सागण्यावरून वाघाची उर्वरित अवयव आशिफाबाद परिसरातून जप्त करण्यात यश मिळाले
वाघ वन्यजीवाची शिकार करून तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केल्याने वन विभागाच्या कारवाईचे अभिनंदन होत असून वनतस्कराचे धाबे दणाणले आहे
पुढील कारवाई मुख्य वनसंरक्षक डाक्टर जितेंद्र रामगावकर,उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचे मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार,वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे आणि टीम करीत आहे
