
राजुरा,(संतोष कुंदोजवार)-
मध्य चांदा वनविभागातील जिवती वनपरिक्षेत्र मध्ये वाघाची चमडी विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला दिनांक 2 एप्रिल रोजी पकडण्यात यश मिळाले.
मिळालेल्या गुप्त माहिती वरुन सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार, व वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी जिवती तालुक्यातील पाटागुडा गावी सापळा रचून वाघाची चमडी विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले. या सापळा मधे एकूण 6 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असता सदरच्या वाघाची शिकार संबधित आरोपींनी तेलंगणा राज्यातील असिफाबाद नजिकच्या भागात केली आणि वाघाची चमडी तस्करी करण्याकरता महाराष्ट्र सिमे लगत असलेल्या जिवती येथील पाटागुडा गावात आणले. तस्करी प्रकरणी मागील 3-4 महिन्यापासून या टोळी च्या मागावर असताना काल रात्री मोठ्या प्रयत्ना नंतर जिवती वनपरिक्षेत्र तील अधिकारी- कर्मचारी यांनी आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले.
मुख्य वनसंरक्षक डॉ श्री जितेंद्र रामगावकर, उपवसंरक्षक मध्य चांदा श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनखाली सदर गुन्ह्या चा पुढील तपास सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे वनपरिक्षेत्र अधिकारी जिवती, करीत आहेत.
सदर कार्यात जिवती वनपरिक्षत्रातील क्षेत्र सहायक एस व्ही सावसागडे, अनंत राखुंडे, के बी करकाळे, डी ए राऊत, वनरक्षक संतोष आलम, संजय गरमाडे, प्रदीप मरापे व बालाजी बिंगेवाड यांनी मोलाचे कार्य केले.

