महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र ;३० मार्च रोजी सुटटीच्या दिवशी देखिल सुरूच

192

 

चंद्रपूर (प्रतिनिधी)
एकंदरीत ५०२ कोटी ४ लाखाच्या थकबाकीचा डोंगर चंद्रपूर परिमंडळात म्हणजे एकंदरीत ३१३ कोटी ४३ लाखाच्या थकबाकीचा डोंगर चंद्रपूर जिल्हयात तर एकंदरीत १८८ कोटी ६० लाखाच्या थकबाकीचा डोंगर गडचिरोली जिल्हयात उभा झाला आहे.

थकबाकी थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम जोरात राबविण्यात येत आहे त्यामुळे ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी व चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी चंद्रपूर परिमंडळात येणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र ३०मार्च २३ रोजी ग्राहकांच्या सोईसाठी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात महावितरणचे उपविभागीय स्तरावरील वीज बिल भरणा केंद्र, जिल्ह्यातील सहकारी पत संस्था व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विज बिल भरणा केंद्र ग्राहकांच्या सोयीसाठी ३० मार्च रोजी सुटटीच्या दिवशी देखिल सुरू राहतील. गावपातळीवर वीज देयकाची भरणा करण्यासाठी ठिकाणी ‘महा पॉवर पे’ची सुविधा आहे.

सोबतच वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरण कडून ऑनलाईन वीज देयकाची भरणा करण्याची सुविधा दिली असून महावितरण ‘मोबाईल एप’चा वापर करून वीज ग्राहक आपल्या देयकाची रक्कम भरू शकतात. लघुदाब वर्गवारीतीलसर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल एप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. ऑनलाईन वीज देयक भरल्यास वेळ व श्रमाची बचत होईल आणि सोबतच ०.२५% डिजिटल पेमेंट भरणा सूट देखील मिळेल.

जिल्हयामधिल, घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची तसेच कृषिग्राहकांनी थकबाकीचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे.