अंगणात असलेल्या बालकास वाघाने उचलून नेले

2576

 

सावली(सुरज बोम्मावार)
सावली तालुक्यातील बोरमाळा या गावी काल दिनांक 29 मार्च ला सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान हर्षल संजय कारमेंगे वय 5 वर्ष हा आपल्या घरा समोर अंगणात खेळत असताना दरवाजा समोर येऊन मुलाला वाघाने उचलुन नेल्याने एकच खळबळ उडाली असून आई ने आरडा ओरड करून ही वाघाने त्या बालकास जंगल परिसरात घेऊन गेल्याने प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

हर्षल हा संजय कारमेंगे यांचा एकुलता एक मुलगा आहे.गेवरा बोरमाळा परीसरात मोठ्या प्रमाणात वाघाची दहशत असून या पहिले शेळ्या मेंढ्या बैल मोठ्या प्रमाणात वाघाने ठार केले आहे. घटनेनची माहीती मिळताच सावली वनपरीक्षेत्र अधिकारी प्रविण विरूरकर व त्यांची टिम दाखल झाली शोध कार्य सुरु आहे.वृत्त लिहे पर्यँत हर्षल चा शोध लागलेला नव्हता.