Home
Homeराजुराधाबा वनपरिक्षेत्राच्या डोंगरगाव बिटात बछडा सह वाघ मृतावस्थेत ? #वनविभागात खळबळ#

धाबा वनपरिक्षेत्राच्या डोंगरगाव बिटात बछडा सह वाघ मृतावस्थेत ? #वनविभागात खळबळ#

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
मध्य चांदा वन विभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र धाबा च्या डोंगरगाव नियत क्षेत्राचे कक्ष क्रमांक 163 आणि 161 मध्ये बछडा सह वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली असून मृत्यू नैसर्गिक की शिकार याचा शोध वन विभाग घेत आहे शिवाय आणखी वाघाच्या बछडा आहे का याचाही शोध सुरू आहे
दिनांक २४ मार्च रोजी वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत डोंगरगाव बीट, कक्ष क्रमांक १६३ मधे वनकर्मचारी यांना गस्ती दरम्यान अंदाजे ४ महिन्याचा वाघाचा बछडा मृत्यू झाल्याचा सायंकाळी उशिरा आढळून आला. सदरच्या बछड्या चे सर्व अवयव सुरक्षित असून प्राथमिक दृष्ट्या त्याचा मृत्यू डीहायड्रेशन व स्टारवेशन ने झाला असल्याचे दिसून आले.
बछड्या च्या मृत्यू नंतर सदरचा वनपरिसर वनकर्मचारी यांनी दिनांक २५ मार्च रोजी सकाळी शोधला असता डोंगरगाव बीट, कक्ष क्रमांक १६१ मधे पूर्ण वयस्क मादी वाघ मृत असल्याचे दिसून आले.याची माहिती वरिष्ठ वणाधिकार्याना देण्यात आले त्यांचे मार्गदर्शनात NTCA च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पशू वैद्यकीय अधिकारी कुंदन पोडचेलवार,पशुधन अधिकारी पराग खोब्रागडे यांचा चमू, प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश बांदककर, NTCA चे प्रतिनिधी बंडू धोत्रे यांच्या मार्फत प्रत्यक्ष ठिकाणची पाहणी करून वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर वाघ अंदाजे ८- ९ दिवसा आधी मरण पावला असल्यामुळे मृत्यू चे कारण कळले नाही. सदर मादीचे सर्व अवयव सुरक्षित असून शिकारी चे कोणतेही पुरावे दिसून आले नाही. मादी वाघ चे दहन मोक्या वरती करून पंचनामा नोंदविण्यात आला.
सदर मादी मृत्यू मुळे तिचा च बछडा उपासमारी मुळे मेल्याचे प्रथमदर्शनी आढळून येते. सदर बछड्या चे शवविच्छेदन TTC चंद्रपूर येथे उपवनसंक्षक मध्य चांदा यांच्या समक्ष करून अवयवाचे नमुने गोळा करून पुढील तपास साठी मिनी फॉरेन्सिक प्रयोगशाळा चंद्रपूर येथे पाठवण्यात येतील.
पुढील तपास वनगुन्हा जारी करून वरिष्ठ वनाधिकारी यानव्हे मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार,,वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबडे करीत आहेत.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !