
#government #school #strike #student #maharashtra #ops

चकपिरंजी(प्रफुल निरूडवार)
सावली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चकपिरंजी येथील शिक्षक संपात सहभागी झालेत. मागील चार दिवसांपासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना शिकविण्यास पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थ तथा पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीकरिता राज्यातील कर्मचारी मागील पाच दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे शाळा बंद पडली आहे. सावली तालुक्यातील चकपिरंजी येथे जिल्हा परिषद शाळा आहे. पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. मुलांची परिक्षा तोंडावर आहे. शिवाय अभ्यासक्रमसुध्दा पूर्ण झालेला नाही, त्यामुळे पालकात मोठी चिंता वाढली. आधीच कोरोना या काळात विद्यार्थ्यांचे तीन वर्ष शैक्षणिक नुसकान झालेले आहे आणि परत शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोयर,उपाध्यक्ष सौ.रोहिणी गावळे, सदस्य किरण चौधरी, दिवाकर नैताम,किरण गावळे,अमृत चौधरी, असूला गावळे,पायल रायपुरे,मंजुषा मोहूर्ले,माजी जिप सदस्य मनिषा चिमूरकर आणि गावातील सरपंच उषाताई गेडाम यांनी पुढाकार घेऊन शिक्षकांचा संप संपेपर्यंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षणाचे धळे देणार देणार आहेत. शाळा व्यवस्थापन समिती व सरपंच यांचे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरुडवार आणि चकपिरंजी गावातील नागरिकांन कडून कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.
