चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेटला सलग सहाव्यांदा ‘बँको’ पुरस्कार प्राप्त

687

#chandrapur #multistate #bank #india

(चंद्रपुर :- सौरव गोहणे)

या वर्षीचा “बँको ब्लू रिबन पुरस्कार २०२२” चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेटला एव्हरशाईन रिसॉर्ट महाबळेश्वर येथे १६ मार्च २०२३ ला ‘ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय श्री.शरद गंगाल’ यांच्या शुभ हस्ते व अशोक नाईक (संचालक गॅलेक्सी एन्मा पुणे), अविनाश शिंञे (संचालक अविज पब्लीकेशन कोल्हापूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

हा सन्मान ग्राहकसेवेत वाहून घेतलेल्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा आणि वेळोवेळी आमच्यामागे उभे राहणाऱ्या हितचिंतकांचा आहे.
पुरस्कार, सन्मान मिळाले की वाढलेल्या जबाबदारीची जाणीव होते आणि आपल्या कामाला गती प्राप्त होते आहे याचा आनंदही होतो. येणाऱ्या काळातही तुम्हा सर्वांची साथ अशीच मिळेल याचा विश्वास आम्हाला आहे.
सर्व चंद्रपूर अर्बन परिवाराचे मनापासून अभिनंदन आणि मनःपुर्वक आभार!

पुरस्कार स्विकारते वेळी संस्थेचे अध्यक्ष रोहित बोम्मावार, उपसरव्यवस्थापक वंदना नखाते ठवकर, प्रशासकीय अधिकारी भरतकुमार नरेडला, शाखा व्यवस्थापक आशिष पिंपळकर, विवेक मेडवे, निलेश कुरमावार, महेश वरहाते, वरिष्ठ सहा.अधिकारी कु.राणी दहेगावकर, मंगेश विधाले लिपिक तुषार खोडे, पियूष गुल्हाने, राधिका राठोड,जयश्री धानोरकर हे उपस्थित होते.