आज पासून सर्व प्रकारच्या बस मध्ये महिलांना 50 टक्के तिकिटात सूट

637

#womens #stategoverment #st

महाराष्ट्र राज्याच्या सण 2023 24 या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये बस प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प मांडतांना केली होती. सदर घोषणेच्या अनुषंगाने दिनांक 17/3/2023 पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीतील राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास मध्ये 50% सवलत करण्यात येत आहे.

सदर सवलतीचे प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येणार आहे. सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 50% सवलत अनुदित करणे बाबत सदर निदेश प्राप्त करण्यात आलेले आहे. त्यात महिलांना साधी ,मिनी, मिनी आराम, वातानुकूलित , शिवशाही, शिवनेरी, शिवाई व इत्यादी सर्व प्रकारच्या निआराम बसेस मध्ये 50% सवलत घोषित करण्यात आलेले आहे.सदर योजना ही ‘महिला सन्मान योजना’ या नावाने संबोधित करण्यात येणार आहे. तसेच सदर सवलती महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत अनुदित आहे. सदर सवलत शहरी वाहतुकीस अनुदेय नाही.महिलांना बस मध्ये 50 टक्के सूट देण्यात येत असल्याने राज्यातील लाखो प्रवाशी महिलांनी आनंद व्यक्त केला आहे.आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.