निराधारांना उत्पन्न दाखला व हयाती दाखल्याची सक्ती करू नये – सावली तहसीलदारांना निवेदन सादर

705

सावली – वयोवृद्ध, अपंग, विधवा यांना स्वतः हजर राहून उत्पन्न दाखले व हयातीचे दाखले सादर करण्याचे आदेशाविरुद्ध माजी पंचायत समिती सभापती यांचे नेतृत्वात निराधारांनी निवेदन सादर केले.
श्रावण बाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या वयोवृद्ध, अपंग, यांना हयातीचे दाखले व उत्पन्न दाखले तहसील कार्यालयात स्वतः उपस्थित राहून द्यायचे आहे . एकीकडे पेन्शन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे उत्पन्न किती वाढले हे विचारत नसतांना निराधारांचे उत्पन्न विचारणे हे चुकीचे आहे. तलाठी कार्यालय, सेतू केंद्रात निराधारांना चकरा मारावे लागत आहे. जे अतिवृद्ध, अपंग आहेत ती निराधार व्यक्ती धास्तावले आहेत . हा प्रकार म्हणजे निराधार व्यक्तींना त्रासदायक आहे. त्यामुळे उत्पन्न दाखला व हयातीचा दाखला स्वतः उपस्थित राहून सादर करण्याची सक्ती करू नये अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी विनोद बांगरे, उसेगावचे सरपंच चक्रधर दुधे, राजू कंचावार, दत्तात्रय नुतलवार यांसह निराधार लाभार्थी उपस्थित होते.