नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला,,चोराला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

466

राजुरा,(नेताजी)-
राजुरा शहरातील बामनवाडा स्थित श्रीकृष्ण नगरीत रात्री घरफोडी करून चोरी करण्यासाठी आलेला चोर वार्डवासीयांच्या नजरेत आला आरडाओरडा करताच लोक जमा झाले आणि त्या चोरास पकडून पोलिसांचे ताब्यात देण्यात आले वार्डवासीयांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा डाव फसला नागरिकांच्या या धाडसाचे पोलिसांनीही अभिनंदन करीत सर्व जनतेनी जागृत राहावे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावावीत असे आवाहन राजुरा पोलिसांनी केले आहे
राजुराजवळील बामनवाडा स्थित श्रीकृष्ण नगरी,तक्षशीला नगर या परिसरात नवीन घरकाम असल्याने विरळ वस्ती आहे याचाच फायदा घेत काही चोर दिवसा फिरून माहिती घेत रात्रीच्यावेळी चोरी क्रिया असल्याच्या घटना घडत आहेत परिणामी याची दखल घेत या वार्डातील लोक रात्रभर वार्डात गस्त करीत आहे असे असतानाही वार्डातील निवासी प्राध्यापक चतूरदास तेलंग हे घरी नसल्याचे पाहून दिनांक 15 मार्च च्या रात्री एक चोर दुचाकीने आला आणि घरात प्रवेश करीत असल्याचे शेजारील जाधव कुटूंबियांनी पाहिले त्यांना संशय आल्याने वार्डातील इतर लोकांना लगेच फोन केले आणि नेहमीप्रमाणे वार्डवासी जोरजोरात शिट्टी वाजवीत त्या घराचे भोवती झाले आणि चोराचा शोध घेऊ लागले अखेर घराचे जिन्याखाली दडून बसलेल्या त्या चोरास पकडन्यात आले त्यानंतर राजुरा पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच ठाणेदार योगेश्वर पारधी आणि पोलिसांनी त्या चोरास ताब्यात घेतले तसेच चोरीच्या कामी वापरण्यात आलेली दुचाकीही जप्त केली सदर चोर एकटाच होता की आणखी कोण साथीदार आहेत याचा शोध पोलिस घेत आहेत
हा चोर येथील एका घरबांधकाम करणाऱ्या ठेकेदार कडे मजूर म्हणून काम करीत असल्याचे समजते
वार्डातील जाधव परिवार,निरंजन गोरे,विवेक बक्षी,चंद्रशेखर खोके,शालीक जुलमे,गजानन राऊत,सुभाष चव्हाण,किर्तीराव सुखदेवें, वीरेंद्र गेडाम,हिमांशू खोके,सौरभ सूर्यवंशी,शारदा राहुल इरावेणी आदी नागरिकांच्या सतर्कता आणि एकतेमुळे एका घरफोडीच्या आरोपीस पकडता आले ही घटनांचा तपास सुरू असतानाच त्याच परिसरातील विलास बोभाटे यांच्याही घरी चोरी करायला आलेला चोर लपून बसला होता आणि पहाटे पहाटे कुणीच नसल्याचे पाहून संरक्षण भिंतीवरून उडी मारून गेल्याचे काही लोकांनी पाहिले एकंदरीत वार्डवासीयांच्या सतर्कतेमुळे दोन घरी चोरी होता होता वाचलेत नागरिकांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
मागील कित्येक दिवसापासून शहरात चोरीच्या घटना घडत आहे शहराचा वाढता विस्तार आणि अपुरे पोलीस कर्मचारी असल्याने पोलिसही हतबल होत असून जनतेने सामूहिक पणे जबाबदारी पार पाडत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन राजुरा पोलिसांनी केले आहे