
राजुरा, (संतोष कुंदोजवार)-
जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागु करावी, या मागणीसाठी राजुरा येथे आज मोर्चाने विविध कार्यालयातून मोर्चाद्वारे कर्मचारी राजुरा तहसील कार्यालयासमोर आले आणि येथे जोरदार घोषणा देत सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला. यावेळी झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी सन 1982 व 1984 ची जुनी पेंशन योजना लागु करावी आणि यासाठी बेमुदत संपात सर्व कर्मचार्यांना सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. हा संप मागण्या मान्य होईपर्यंत सुरू राहणार असल्याचे यावेळी बोलतांना वक्त्यांनी सांगितले.
या आंदोलनाचे नेतृत्व विमाशी जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, पुरोगामी शिक्षक समितीचे अध्यक्ष संदीप कोंडेकर, सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष राजु डाहूले, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रदीप पायधन, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अमोल बदखल, आरोग्य संघटनेचे मधुकर टेकाम, सुरेश खाडे, जिल्हा नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा रंजीता कोहपरे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष हंसराज शेंडे,शिक्षक परिषदेचे किरण लांडे, पी.आर.कामडी, हिवताप संघटनेचे संतोष कुकडे, पंचायत विभागाचे पंकज गावंडे,राजकुमार आत्राम, दिलीप घ्यार, सुधीर झाडे, दीपक भोपळे, श्रीकांत भोयर, एस.एस.आवारी यांनी केले. या आंदोलनात शेकडो शासकीय, निमशासकीय कर्मचारी पुरुष आणि लाक्षणिक संख्येत महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

