जुनी पेन्शन साठी राज्य कर्मचारी समन्वय समितीचा बेमुदत संप;सावली तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

1070

#maharashtra #pension #gov

1नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर सेवेत रुजु झालेल्या राज्यसरकारी व निमसरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह अनेक समस्या घेऊन राज्य कर्मचारी समन्वय समितीने दिनांक 14 मार्च 2023 पासून समस्या सुटेपर्यंत बेमुदत संप पुकारला आहे. आज सावली येथील तहसील कार्यालया समोर आंदोलन सकाळी 10 वाजेपासून सायं 5 वाजेपर्यंत मागण्या पूर्ण होईपर्यंत हा संप अविरत सुरु राहणार आहे.

राज्यातील 17 लाख कर्मचारी आजच्या संपात सहभागी झाले आहेत. सावली तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती,खाजगी शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना,आरोग्य विभाग,महसुल विभाग,भुमी अभिलेख विभाग,कृषी विभाग,सफाई कामगार विभाग, वन विभाग, नगरपंचायत विभाग, पशुसंवर्धन विभाग, यासह इतर विभागांनी संपात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. जुनी पेंशन योजना जोपर्यंत शासन लागु करणार नाही तोपर्यंत हा संप अविरत सुरू राहणार आहे. यावेळी प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला मार्गदर्शन केले. आज बेमुदत संपाचा पहिला दिवस आहे. जवळपास दीड ते दोन हजार कर्मचारी संपात सहभागी होते.या संपामुळे शासकीय कार्यालये ठप्प पडलेली आहेत तसेच तालुक्यातील शाळा सुद्धा बंद आहेत. या संपाची दखल शासनाने त्वरीत घेऊन समन्वय समितीने दिलेल्या मागण्या व जुनी पेन्शन योजना त्वरीत लागु करावी अन्यथा संपाची तीव्रता वाढवून सरकार नामुष्कीची वेळ येण्यास अवधी लागणार नाही.

1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांसाठी म्हातारपणी ची आधार आहे.30ते 40 वर्ष प्रामाणिक सेवा करून कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळत नसेल तर भविष्यात म्हातारपणी कर्मचाऱ्यांनी कसे जगावे हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी हा बैमुदत संपाचा शस्त्र उगारण्यात आलेला आहे.