Home
Homeराजुराजिल्ह्यातील ३६ हजार उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ* *गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगावच्या ९०...

जिल्ह्यातील ३६ हजार उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ* *गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगावच्या ९० शेतकऱ्यांचा समावेश. *नविन अर्थसंकल्पात तरतूद. *सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाला यश.

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था यांचे कडून राज्यातील अनेक शेतकरी शेती कर्ज घेतलेत त्यापैकी संस्थांचे यादीत पात्र लाभार्थी शेतकरी असताना त्याना आजपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिल्या गेला नव्हता. परंतु वंचीत शेतकऱ्याच्या सतत मागणीची दखल घेऊन सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी शासन दरबारी हा प्रश्न लावून धरला आणि अखेर या शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे यामुळे शेतकऱयांत आनंद व्यक्त होत सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे
महाराष्ट्र सरकारने शेतकऱयांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 तसेच महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 लागू केली राज्यातील अनेक विविध कार्यकारी सहकारी संस्था,सेवा सहकारी संस्था यांचेकडून पात्र शेतकर्याचे अहवाल मागविण्यात आले होते परंतु या योजनेत जिल्हा भरात ३६ हजार तर गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील सेवा सहकारी शेतकरी संस्थेचे ९० पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. सदर शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ न मिळाल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागला. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले होते. हि गंभीर बाब निदर्शनास येताच व शेतकऱ्यांची थट्टा होत असल्याचे पाहून तोहोगाव येथील वंचीत शेतकऱयांनी भाजपा किसान आघाडीचे महामंत्री बंडू गौरकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे मार्फतीने कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांचा संबंधित मुद्दा उपस्थित करित जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांचेकडे पाठपुरावा केला. मात्र कारवाई च्या अभावाने प्रकरण थंड बस्त्यात राहिले अखेर पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना संबंधित शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात पत्रव्यवहार करून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मागणी केली. नामदार सुधिर मुनगंटीवार यांच्या मार्फत विधानभवनात आढावा घेण्यात आला. तेव्हा दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ देण्याचे आश्वासन प्रधान सचिवांनी दिले. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पुरवणी मागण्या वरिल चर्चा सत्रात मुद्दा उपस्थित केला गेला. यात उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ देण्याचे मान्य झाले. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 36 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ मिळणार असून यासाठी नामदार सुधिर मुनगंटीवार यांनी सतत पाठपुरावा करित सरकार पुढे शेतकऱ्यांचा आर्थिक विवंचनेचा विषय लावून धरला आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ मिळवून दिल्याबद्दल सर्व शेतकऱ्याच्या वतीने देवराव भोंगळे व बंडू गौरकर यांनी नामदार सुधिर मुनगंटीवार यांचे तोहोगाव येथील शेतकरी किशोर कासनगोटूवार ,योगेश खामनकर सह इतर शेतकऱयांनी आभार मानले आहेत.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !