Home
Homeचंद्रपूरशेतकरी सहवेदना जागवु या...! चंद्रपूर जिल्ह्यातील किसानपुत्र (स्त्रि, पुरुष) सावली येथे रविवार...

शेतकरी सहवेदना जागवु या…! चंद्रपूर जिल्ह्यातील किसानपुत्र (स्त्रि, पुरुष) सावली येथे रविवार दिनांक १९ मार्च २०२३ रोजी करणार अन्नत्याग आंदोलन.

 

*अन्नत्याग आंदोलन*
देशभरातील शेतक-यांनी केलेल्या आत्महत्यांप्रति व संकटात सापडलेल्या शेतकर्यांन विषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे प्रनेते अमर हबीब यांच्या मार्गदर्शनात
रविवार, दिनांक १९ मार्च २०२३ रोजी लाखो किसानपुत्र (स्त्री-पुरुष) लाक्षणिक उपवास करणार आहेत. हा उपवास महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून होईल, तसेच देशातील अन्य राज्यात व विदेशातही अनेक किसानपुत्र अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत.

*चंद्रपूर जिल्ह्यातील किसानपुत्र सावली येथे करणार अन्नत्याग आंदोलन*
चंद्रपूर जिल्ह्यातील किसानपुत्र रविवार,दिनांक १९ मार्च २०२३ रोजी सावली येथील तालुका पत्रकार संघाच्या भवनात सकाळी ११ ते‌ सायंकाळी ५ वाजेपर्यंत सामुहिक एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
टिप:- समारोपीय कार्यक्रम ४ वाजता सुरू होईल, ज्यांना पुर्ण वेळ बसायचे आहे त्यांनी पुर्ण वेळ यावे. किसानपुत्रांनी समारोपीय कार्यक्रमात अवश्य उपस्थित रहावे.

*शेतकरी सहवेदना व निर्धार यात्रा – १३ मार्च ते १९ मार्च किनगाव ते धुळे*
मागील दोन वर्षां प्रमाणे यावर्षीही पदयात्रेचे नियोजन केले आहे. लढाऊ शेतकरी स्वातंत्र्य सैनिक दिवंगत कडु अप्पा पाटिल यांच्या जळगाव जिल्ह्यातील किनगाव (तालुका यावल) या गावापासून १३ मार्च २०२३ या दिवशी शेतकरी सहवेदना व निर्धार यात्रा निघणार आहे आणि ती १९ मार्च २०२३ रोजी धुळ्यात पोहचेल. धुळ्यात सामुहिक उपवासाचा व पदयात्रा समारोपाचा कार्यक्रम होईल.

*घटनेतील परिशिष्ट ९*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीने तयार केलेली घटना देशाने २६ जानेवारी १९५० रोजी स्विकारली. त्यात फक्त ८ परिशिष्टे होती. १८ जुन‌ १९५१ या दिवशी पहिली घटना दुरुस्ती करून परिशिष्ट ९ जोडले गेले. परिशिष्ट ९ मध्ये काही कायदे टाकले ‌गेले आणि या कायद्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही, असे घटनेतील अनुच्छेद ३१ए व बी मध्ये उल्लेखीत करण्यात आले. परिशिष्ट ९ मध्ये जवळपास २५० शेतकरी विरोधी कायदे टाकले आहेत. अश्या प्रकारे मूळ घटने‌ मध्ये बिघाड करण्यात आला. त्यालाच ‌आमचा विरोध आहे.

*१९ मार्चलाच अन्नत्याग आंदोलन का?*
१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी त्यांची पत्नी मालतीताई व चार अपत्यांसह आत्महत्या केली होती. ही शेतकर्‍यांची पहिली सामुहिक आत्महत्या मानली जाते. साहेबराव करपे यांनी मरण्यापुर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी शेतकर्‍यांच्या दुर्दशेकडे सरकारचे लक्ष वेधले होते. दुर्दैवाने कोणत्याच सरकारने शेतकर्‍यांच्या बिकट परिस्थितीचा विचार केला नाही. साहेबराव करपे यांच्या आत्महत्येनंतर असा एकही दिवस गेला नाही, ज्या दिवशी शेतकर्‍यांची चिता जळाली नाही. आजपर्यंत सुमारे साडेतीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. दुर्दैवाने राज्य वा केंद्र सरकार त्याची गंभीरपणे दखल घेत नाही. कापूस, कांदा, सोयाबीन, डाळी यांचे भाव पाडले जात आहेत. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांच्या ‘आत्महत्या’ ह्या खरेतर पडलेले ‘खून’ आहेत कारण या आत्महत्यांच्या तळाशी शेतकरी विरोधी नरभक्षी कायदे आहेत व ते रद्द करणे सरकारच्या हातात आहे. अशा स्थितीत तुम्हा-आम्हालाच हा शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर आणावा लागणार आहे.

*शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती*
शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती मानली पाहिजे. या आपत्तीला तोंड देण्यासाठी समाजाने आणि सरकारने पुढे आले पाहिजे. देशात एकाही शेतकर्‍यांची आत्महत्या होणार नाहीत यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अन्नत्यागाचा कार्यक्रम कोणा राजकीय पक्षांचा किंवा संघटनेचा नाही. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी आपण आपले सारे मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. त्याच भावनेने १९ मार्चला उपवास करावा, ही विनंती!

*अन्नत्यागाचे तीन पर्याय-*
1) देवा-धर्मासाठी आपण अनेक उपवास केले. एक उपवास शेतकर्‍यांसाठी करावा. अशा प्रकारे तुम्ही तुमचे काम करीत वैयक्तिक उपवास करू शकता.
2) हे उपोषण कोण्या पक्षाचे वा संघटनेचे नाही. यात कोणतीही संघटना पक्ष सहभागी होऊ शकते. हवे तर एकत्र किंवा स्वतंत्रपणे ठिकठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी बसूनही उपोषण करू शकता.
3) वैयक्तिक उपवास करणे, सामुहिक उपोषण करणे शक्य नसेल तर (खास करून विद्यार्थी) दोन मिनीटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करू शकतात.

*कळकळीची विनंती*
१९ मार्चला आत्महत्या केलेल्या
सर्व शेतकर्याना स्मरून शेतकरी स्वातंत्र्यासाठी एक दिवस
अन्नदात्यासाठी अन्नत्याग करू. या आपल्या भावनेचा, कृतीचा आणि संकल्पाचा दूरगामी परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही. म्हणून, १९ मार्चच्या उपोषण/ उपवास/ अन्नत्याग आंदोलनात सहभागी व्हा,
आम्ही तुम्हाला मत मागत नाही, पैसे मागत नाही, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी फक्त एक दिवस अन्नत्याग/उपवास करावा, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे.

*सहभागासाठी संपर्क करावे*
*मा. अमर हबीब, प्रनेते,किसानपुत्र आंदोलन* अंबाजोगाई, जि. बिड
084119 09909
कुणाल निंबाळकर, (हिरापूर) सावली, जि. चंद्रपूर 8766746476
सुरज बोम्मावार, सावली, जि. चंद्रपूर 94228 38725

*सावली, जि.चंद्रपूर*
*रविवार दिनांक १९ मार्च २०२३ ला सकाळी ११ ते‌ ५*
*स्थळ: तालुका पत्रकार संघ भवन, सावली, जि.चंद्रपूर*

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !