सावली येथे स्पंदन सखी परिवारातर्फे होम मिनिस्टर स्पर्धेला व भव्य आनंद मेळावा उत्तम प्रतिसाद

455

#saoli #chandrapur #celebration #worldwomensday

सावली(प्रतिनिधी)
स्पंदन सखी परिवार सावली तर्फे ॲग्री नंदिनी सखी परिवार ग्रुप 5 च्या वतीने च्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 11 व 12 मार्चला सावली येथील जुनी नगरपंचायत च्या पटांगणावर होम मिनिस्टर व भव्य आनंद मेळावा चे आयोजन केलेले होते त्याला प्रंचड प्रतिसाद मिळाला.

या दोन दिवसीय सदर कार्यक्रमात ‘मी होणार सावलीची होम मिनिस्टर’ व ‘फॅशन शो’ या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.रुपाली बोम्मावार यांच्या हस्ते करण्यात आले.तर अध्यक्षस्थानी नगरपंचायत चे नगराध्यक्ष सौ लताताई लाकडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.राजश्री मार्कंडेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या होम मिनिस्टर स्पर्धेत सौ. श्वेता सुनील बेजगमवार या विजयी ठरल्या तर फॅशन शो या स्पर्धेचे प्रथम विजेते सौ.मंजू अजय पोटवार, द्वितीय सौ रिंकी गुणवंत सुरमवार, तृतीय सौ.किरण बंडावार हे या स्पर्धेचे मानकरी ठरले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व शिल्ड देण्यात आले.

तर दिनांक 12 मार्च भव्य दिव्य आनंद मेळाव्याचे उद्घाटन ब्रह्मपुरी-सावली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी केले तर अध्यक्षस्थानी चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट चे अध्यक्ष रोहित बोम्मावार होते.यावेळी प्रमुख अतिथी संतोषभाऊ तंगडपल्लीवार माजी बांधकाम सभापती चंद्रपूर, प्रा. आसुटकर सर,नगरपंचायत उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार,नगरसेवक सतीश बोम्मावार, अशोक आकुलवार,निखिल सुरमवार,पराग नाडेमवार, अंकुश शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या आनंद मेळाव्यात सखी ग्रुपने विविध राज्याच्या पोशाखात होते त्यांनी उत्कृष्टपणे स्टॉल सजवून स्वादिष्ट असे पदार्थ तयार करण्यात आले. आणि या या मेळाव्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.

यावेळी सर्व मान्यवर व चंद्रपूरचे परीक्षक यांनी आनंद मेळाव्यातील सर्व सखींचे व आयोजकांची स्तुती केले. की आज पर्यंत आनंद मेळावा बघितले परंतु सावलीसारखा आनंद मेळावा असं कुठेच झाला नाही असे ते म्हटले.

आनंद मेळावा ही स्पर्धा असल्याने परीक्षकाच्या निर्णयाने प्रथम विजेते कश्मीरी ग्रुप,द्वितीय विजेते गोवा ग्रुप तृतीय बंगाली ग्रुप चौथा  केरला ग्रुप  व पांचवा महाराष्ट्र  व राजस्थानी  ग्रुप  मधे  विभागुन  देण्यात  आले या  स्पर्धेचे मानकरी ठरले यांना परिक्षकांच्या हस्ते रोख रक्कम व शिल्ड देण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.

या दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयोजक सौ सरिता यासलवार ,वंदना चिंतलवार, प्रीती झोडे ,सपना वीरमलवार, स्नेहा आकुलवार मोनाली बल्लावार आरती वीरमलवार अक्षता आइचवार ऐश्वर्या यासलवार पूजा चिटमलवार श्रुती आईंचवार या आयोजकांनी कार्यक्रम यशस्वी करिता अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्तविक सपना विरमलवार यांनी केले तर संचालन पल्लवी दंडमवार यांनी तर आभार प्रीती झोडे यांनी मानले.