
#saoli #bhajapa #Worldwomenday #Sport #trend #chandrapur #snewsnetwork #portal

सावली:-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सावली येथील भाजपा तालुका महिला मोर्चाच्या वतीने भव्य महिलांचे कब्बडी सामने चे आयोजन केले होते.दोन दिवसीय या सामने मध्ये पहिल्या दिवशी दिनांक 8 मार्च ला गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते व
भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे व महिला भाजपा जिल्हा अध्यक्ष अल्काताई आत्राम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते.
या स्पर्धत सावली तालुक्यातील एकूण 28 महिला संघांनी सहभाग घेतला होता.
दिनांक 9 मार्च ला पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी ब्रम्हपुरी-सावली विधान सभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.तर भाजपा महिला च्या वतीने ,सिनेट सदस्य सौ किरणताई गजपुरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धनश्री मरलावार, भाजप जेष्ठ नेत्या शोभाताई बोगावार व पंच म्हणून डॉ.प्रा.भास्कर सुकारे यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी कब्बडी सामने मध्ये प्रथम क्रमांक जय जिजाऊ महिला ग्रामसंघ चकपिरंजी हेटी यांना 21हजार रुपये रोख व ट्रॅफि, द्वितीय क्रमांक जिजामाता महिला ग्रामसंघ जाम बुज यांना 15 हजार रोख व ट्रॅफि,तृतीय क्रमांक सावित्रीबाई महिला ग्रामसंघ व्याहड खुर्द यांना 11 हजार रोख व ट्रॅफि,चौथा क्रमांक ज्ञान ज्योती महिला ग्रामसंघ निमगाव यांना 7 हजार रोख व ट्रॅफि तसेच उत्कृष्ट खेडाडू वैशाली मेश्राम ,उत्कृष्ट रेडर विशाखा पोटे,उत्कृष्ट डिपेंडर पायल मेघाडे यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात आले.तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकांना नामांकित कंपनीचे ब्याग वाटप देण्यात आले.
या कार्यक्रमाला मंचावर, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे,भाजप जिल्हा सचिव संतोष तंगडपल्लीवार,तालुका अध्यक्ष अविनाश पाल,जेष्ठ नेते प्रकाश पा. गड्डमवार,जेष्ठ नेते देवराव सा. मुद्दमवार,तालुका भाजप महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार,दिलीप ठिकरे,कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, सावली शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, माजी जि. प. सदस्या सौ. मनिषाताई चिमुरकर, सौ. योगीताताई डबले, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सौ. पुष्पाताई शेरकी,माजी सभापती छायाताई शेंडे, नगरसेविका सौ. निलीमाताई सुरमवार, नगरसेविका सौ. शारदाताई गुरनूले, सौ. विद्याताई कवठे, अरूण पाल, रविंद्र बोल्लीवार,डॉ.तुषार मरलावार,कृष्णा राऊत,निखील सुरमवार, गौरव संतोषवार,राकेश विरमलवार, सौ. प्रतिभाताई बोबाटे, भाजप महिला शहराध्यक्ष सौ. गुड्डीताई सहारे,सौ. कविताताई बोल्लीवार, सौ. शोभाताई बाबणवाडे, सौ. छायाताई चकबंडलवार,सिंधुताई मराठे,सरिता वाघ,वनिता मोहूर्ले, स्नेहा आकुलवार,मोनिका शिंदे,मीनाक्षी वाकुळकर,मालती सोनूले,राकेश कोंडबत्तुलवार, राहुल लोडेलीवार, इम्रान शेख,आशिष मूत्यालवार,हरीश जक्कुलवार,आशिष संतोषवार,अतुल लेनगुरे,मयूर गुरुनुले, शरद सोनवणे,आदर्श कुडकेलवार,अभि संतोषवार,कपिल लोडेलीवार, साकेत शेंडे, संदीप आवळे,गणेश यलचलवार आदिंसह सावली शहर व तालुक्यातील महिला भगिनी व युवा पदाधिकारी याठिकाणी मोठी उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका निलमताई सुरमवार,सूत्रसंचालन शोभाताई बाबनवाडे यांनी केले आभार गुडडी सहारे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व महिलांनी सहकार्य केले.
