क्रीडा क्षेत्रातही महिला मागे नाही हे या प्रतिसादातून कळते-खासदार अशोक नेते.

382

#saoli #bhajapa #kha.ashoknete #worldwomenday

सावली:-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज सावली येथील भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित भव्य तालुकास्तरीय महिलांच्या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते होते.

यावेळी खासदार नेते यांनी केंद्रशासनामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. महिलांना शिक्षित, सक्षम आणि स्वयंपूर्ण बनविण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ‘या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी केला.या योजनेचा मुख्य उद्देश मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे आणि शिक्षणाद्वारे त्यांना सक्षण बनविणे,मुलीचा जन्म आणि तिचे जगणे सुरक्षित करणे हा आहे.
महिलांच्या शिक्षणाची सुरुवात फुले दाम्पत्यानी केली त्यावेळी त्यांना समाजाच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. पण तरीही सगळ्या प्रकारचा विरोध पत्करुन त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ चालू ठेवली. त्याचेच फलस्वरुप म्हणून आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहे.आज या क्रीडा स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद म्हणजे महिला क्रीडा क्षेत्रात मागे नाही असे दिसते.

आंतरराष्ट्रीय महिला
दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे आहे असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केले.

या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी म्हटले की,आजकाल महिला अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात काम करत आहेत.असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात महिला अग्रेसर नाहीत. पूर्वी महिलांना योग्य संधी दिली जात नव्हती परंतु महिलांच्या प्रत्येक कलागुणांना वाव दिला जातो.असे प्रतिपादन यावेळी देवराव भोंगळे यांनी केले.

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अल्काताई आत्राम यांनी महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, महिला सशक्तिकरण, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये महिला काम करीत आहे.आणि विविध कार्यक्रमाचेआयोजन सुद्धा जिल्हाभर होत आहे. असे याप्रसंगी महिलांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे नगरसेविका प्रास्ताविक निलीमाताई सुरमवार,सूत्रसंचालन शोभाताई बावनवाडे,आभार प्रदर्शन छायाताई शेंडे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व महिलांनी सहकार्य केले.

या कार्यक्रमाला मंचावर, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कु. अल्काताई आत्राम,भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल,जेष्ठ नेते प्रकाश पा. गड्डमवार,जेष्ठ नेते देवराव सा. मुद्दमवार,तालुका भाजप महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार,कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, सावली शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, माजी जि. प. सदस्या सौ. मनिषाताई चिमुरकर, सौ. योगीताताई डबले, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सौ. पुष्पाताई शेरकी,माजी सभापती छायाताई शेंडे, नगरसेविका सौ. निलीमाताई सुरमवार, नगरसेविका सौ. शारदाताई गुरनूले, सौ. विद्याताई कवठे,सचिन तंगडपल्लीवार, अरूण पाल, डॉ. धनश्री मर्लावार,माजी उपसभापती रविंद्र बोल्लीवार, कविंद्र रोहणकर, निखील सुरमवार, गौरव संतोषवार, जितू सोनटक्के, राकेश विरमलवार, डॉ. षडाकांत कवठे, मोतीराम चिमुरकर, सौ. प्रतिभाताई बोबाटे, सौ. गुड्डीताई सहारे,सौ. कविताताई बोल्लीवार, सौ. शोभाताई बावणवाडे, सौ. छायाताई चकबंडलवार आदिंसह सावली शहर व तालुक्यातील महिला भगिनींची याठिकाणी मोठी उपस्थिती होती.