नगरसेवक सतीश बोम्मावार यांच्या जनसंपर्क कार्यालयाला खासदार अशोक नेते व जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट

265

#saoli #khasdarnete #bhajapa

सावली(सौरभ गोहणे)

सावली येथील नगरपंचायत चे नगरसेवक ,गटनेते तथा भाजपा तालुका महामंत्री सतिषभाऊ बोम्मावार यांच्या सावली येथील जनसंपर्क कार्यालयाला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते ,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष तथा भाजपा चे जिल्हाअध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांनी भेट दिली व शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल माजी तालुकाध्यक्ष देवराव मुद्दमवार,नगरसेविका नीलम सुरमवार, नगरसेविका शारदा  गुरुनुले, सावली शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर,गौरव संतोषवार,निखील सुरमवार, कृष्णा राऊत,जीबगाव ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार,व्याहड बुज ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गेडाम आदी जण उपस्थित होते.