
भाजपा महिला मोर्चा तर्फे आयोजन

सावली(प्रतिनिधी)
सावली तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ८ व ९ मार्चला सावली येथील डॉ.तुषार मारलावार यांच्या पटांगणावर भव्य तालुका स्तरीय महिलांचे कबड्डी सामने आयोजित केलेले आहे.
दोन दिवसीय सदर कार्यक्रम पार पडणार असून या उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते राहणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, सह उद्घाटक भाजपा जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष अलकाताई आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले ,भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल, भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार,भाजपा तालुका महिला मोर्चा अध्यक्ष पुष्पाताई शेरकी, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विनोद धोटे उपस्थित राहणार आहे.
तर दिनांक ९ ला बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ब्रह्मपुरी सावली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर राहणार आहेत.
तर प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार,सिनेट सदस्य किरणताई संजय गजपुरे,भाजपा ज्येष्ठ महिला नेत्या शोभाताई बोगावार, भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल ,भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार,भाजपा तालुका महामंत्री दिलीप ठाकरे, भाजपा सावली शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, माजी महिला तालुकाध्यक्ष विद्याताई कवठे हे उपस्थित राहणार आहे. या दोन दिवसीय होत असलेल्या महिलांच्या कबड्डी सामनेकरीता प्रथम पारितोषिक 21 हजार रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय पारितोषिक 15 हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक 11 हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ बक्षीस सात हजार रुपये व सन्मानचिन्ह व सर्वात उत्कृष्ट 1000 रुपये व सन्मान चिन्ह ,सर्वात उत्कृष्ट रेडर 701 रुपये व सन्मान चिन्ह सर्वात उत्कृष्ट डिफेंडर 701 रुपये सन्मान चिन्ह असे भरगोस बक्षीसाची लयलुट या निमित्ताने करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमाकरिता प्रवेशासाठी संपर्क करावे व जास्तीत जास्त क्रीडा महिला क्रीडापटूंनी सहभागी नोंदवावा असे आवाहन भाजपा जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष तथा नगरसेविका नीलम सुरमवार, भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष पुष्पाताई शेरकी, माजी जि प सदस्य मनीषाताई चिमुरकर, माजी जि प सदस्य योगिताताई डबले, भाजपा महिला शहराध्यक्ष गुड्डी ताई सहारे, नगरसेविका शारदाताई गुरुनुले, माजी पंचायत समिती सभापती छायाताई शेंडे, व्याहड बुज सरपंच कविताताई रवींद्र बोलीवार,व्याहड खुर्द चे माजी उपसरपंच शोभाताई बाबनवाडे, भाजपा महिला नेत्या प्रतिभाताई बोबाटे, माजी सरपंच अंतरगाव छायाताई चकबंडलवार यांनी केलेले आहे.